ETV Bharat / state

अक्षय शिंदेचा 'एन्काऊंटर' करणाऱ्या पोलिसांना शर्मिला ठाकरेंकडून बक्षीस; किती पैसे मिळणार? - Akshay Shinde Encounter

Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार घटनेमुळं राज्यात खळबळ उडाली होती. एका नामांकित शाळेत दोन मुलींवर अत्याचाराची घटना घडलेली. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या एन्काऊंटरवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर होत आहे, मात्र मनसेनं पोलिसांनी योग्य केल्याचं म्हटलंय.

Akshay Shinde Encounter
शर्मिला ठाकरेंकडून बक्षीस जाहीर (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2024, 3:21 PM IST

Updated : Sep 24, 2024, 3:53 PM IST

ठाणे Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. आरोपीनं पोलीस अधिकारी निलेश मोरे यांची पिस्तूल खेचून घेतली व पोलीस पथकाच्या दिशेनं 3 राऊंड फायर केले. याला प्रत्युत्तर देताना आत्मरक्षणासाठी त्याचा एन्काऊंटर केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या एन्काऊंटरवरून सरकारवर टीका करत आहेत, मात्र मनसेनं पोलिसांनी योग्य केल्याचं म्हणत घटनेचे समर्थ केलंय. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना प्रत्येकी 51 हजार रूपयांचं बक्षीस जाहीर केलं. मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी माहिती दिली.

राज ठाकरे करणार विचारपूस : बदलापूर प्रकरणातल्या एन्काऊंटरनंतर या प्रकारात जखमी झालेल्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना बक्षीस जाहीर करून मनसेनं आपली भूमिका स्पष्ट केलीय. तर दुसरीकडे आता या जखमी दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांची विचारपूस राज ठाकरे स्वतः करणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली.

मनसे नेते अविनाश जाधव (Source - ETV Bharat Reporter)

अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर कसा झाला? : ठाणे क्राईम ब्राँच युनिट 1 मध्ये अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल होता. त्याचा तपास करण्यासाठी ठाणे क्राईम ब्राँच तळोजा जेलमध्ये गेले होते. त्यानंतर त्याला बदलापूरला घेऊन जात असताना अक्षय शिंदेनं पोलीस अधिकाऱ्याची बंदूक खेचुन तीन राऊंड फायर केले. यातील एक गोळी पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या पायाला लागली तर इतर दोन राऊंड इतरत्र फायर झाले. त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलीस अधिकाऱ्यानं त्याला गोळ्या घातल्या. यामध्ये अक्षय शिंदे आणि जखमी पोलीस अधिकारी यांना कळवा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी तपासून आरोपी अक्षय याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हेही वाचा

  1. बदलापुरातल्या चिमुकलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर; गृह विभाग संशयाच्या भोवऱ्यात - akshay shinde encounter
  2. अक्षय शिंदेच्या कथित एन्काउन्टर प्रकरणाची सीआयडी करणार चौकशी - Akshay Shinde encounter
  3. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर : शिवसेनेकडून पेढे वाटत जल्लोष, आंदोलकांनी काय दिली प्रतिक्रिया ? - Akshay Shinde Encounter

Last Updated : Sep 24, 2024, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.