ETV Bharat / state

खासदारांनी भाकित कधीपासून सांगायला सुरुवात केली, आमदार सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर - Satej Patil

Satej Patil : लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा एकही खासदार निवडून येणार नसल्याचा दावा करणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांना काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. जे स्वतःचे तिकीट एका मिनिटात आणू शकत नाहीत, ते जनतेचे प्रश्न काय सोडवणार, असा टोला त्यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला आहे.

Satej Patil
आमदार सतेज पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 10:32 PM IST

सतेज पाटील यांची पत्रकार परिषद

कोल्हापूर Satej Patil : राज्यात काँग्रेसचा एकही खासदार निवडून येणार नाही, अशी टीका भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केली. त्यावर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. खासदार महाडिक भाकीत कधीपासून सांगायला लागले. त्यांना भाकित कळत असेल तर, त्यांच्याकडं जावून माझ्या कुंडलीबद्दल माहिती घेतो, अशा शब्दात आमदार सतेज पाटलांनी खासदार महाडिकांवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आमदार पाटील पत्रकारांशी बोलत होते.

...ते जनतेचे प्रश्न काय सोडवणार : 'महाविकासआघाडीकडून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं संभाजीराजे छत्रपती यांनी प्रचाराला सुरुवात केलीय. तर, दुसरीकडं महायुतीमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीमध्ये सहभागी झालेल्यांना तिकिटासाठी मारामारी करावी लागत आहे. तिकिटासाठी ज्यांना धावपळ करावी लागत आहे. जे स्वतःचे तिकीट एका मिनिटात आणू शकत नाहीत, ते जनतेचे प्रश्न काय सोडवणार, असा टोला देखील पाटील यांनी भाजपाला लगावला आहे. शाहू महाराज जनतेचे आवाज आहेत. ते संसदेमध्ये जनतेचे प्रश्न सोडवतील. त्यामुळं विरोधकांचा कॉन्फिडन्स गेला आहे. भाजपाच्या तिकिटावर लढण्यासाठी सात खासदारानी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळं महायुतीत टोकाची लढाई सुरू' असल्याचं आमदार पाटील म्हणाले.

वंचितबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत आमची बैठक झाली. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची चर्चा उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुरू आहे. वंचितबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न आज सकाळपर्यंत सुरू होता. हातकणंगले संदर्भात एक-दोन दिवसात निर्णय होईल. महायुतीचं देखील अद्याप काहीही ठरलेलं नाही. मात्र, तरीही राजू शेट्टी यांचा दौरा किमान पूर्ण झाला आहे. आमची चर्चा सुरू आहे. याला दोन ते तीन दिवस लागेल. आम्ही या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊ. महाविकास आघाडी म्हणून वंचित आमच्यासोबत यावी, ही आमची अपेक्षा होती. मात्र जागा वाटपात मतभेद झालेले दिसत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही, चर्चेतून मार्ग काढण्याची आमची सकारात्मक भूमिका असल्याचं आमदार सतेज पाटील सांगितलं.

खासदार उदयनराजे भोसलेंना टोला : गादीचा सन्मान कोण ठेवतो हे जनतेला माहिती आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले भाजपा खासदार उदयनराजे भोसले दिल्लीमध्ये तीन दिवस होते. तरीदेखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना भेट दिली नाही. हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं भूषणावह आहे का? हा अपमान कोणाचा आहे. हे सर्व महाराष्ट्राची जनता बघत आहे, गादीचा मान कोण ठेवतं, कोण ठेवत नाही हे जनता जाणते. म्हणून आम्ही शाहू महाराजांना विनंती करून उमेदवारी देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला. मात्र भाजपाकडून साताऱ्याच्या बाबतीत निर्णय होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान कोण ठेवत आहे, हे लोकांना माहितीय, असं सांगून आमदार सतेज पाटील यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

हे वाचलंत का :

  1. अमरावतीत नवनीत राणा यांच्या हाती कमळ: भाजपाने अधिकृत उमेदवार म्हणून केले जाहीर - Navneet Rana BJP Candidate
  2. नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या नेत्याकडून बंडखोरीचे संकेत - Lok Sabha Elections
  3. पक्षांतर्गत नेत्यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली? शिंदे गटाला अपेक्षित जागा नाहीच? - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.