ETV Bharat / state

'त्या' युवकाला चोप दिल्याचा पश्चाताप नाही, मारहाण प्रकरणावर आमदार संजय गायकवाड यांचं विधान - शिवजयंती मिरवणुकीत तरुणाला मारहाण

Sanjay Gaikwad : बुलडाण्यात शिवजयंती मिरवणुकीत तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी पश्चाताप नसल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. गायकवाड यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात माध्यमांसमोर मारहाण प्रकरणातील त्यांची भूमिका मांडली.

MLA Sanjay Gaikwad
आमदार संजय गायकवाड यांची पत्रकार परिषद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 5:47 PM IST

संजय गायकवाड यांची पत्रकार परिषद

बुलडाणा : शिवजयंती मिरवणुकीत तरुणाला मारहाण केल्याचा आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. त्यावर आमदार गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली आहे. 'त्या' तरुणाला चोपल्याचा माला कोणताही खेद वाटत नाही, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या संपर्क कार्यालयात आज शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदारांनी या मारहाणीचं जोरदार समर्थन केलंय. तसंच त्यांनी मारहाणीमागची कारणंही माध्यमांना सांगितली.

मारहाणीचा पश्चाताप नाही : बुलडाण्यात कार्यरत असलेल्या टोळीनं गांजा पिऊन मिरवणुकीत अनेक माता बहिणींवर या आगोदर चाकूनं हल्ला केलाय. यंदाच्या मिरवणुकीपूर्वी देखील आम्ही पोलिसांना याची कल्पना दिली होती. मिरवणुकीत एका मुलीनं याबाबत माला माहिती दिली. एका टोळक्याचा चाकूनं हल्ला करण्याचा बेत असल्याचं तिनं मला सांगितलं. त्यानंतर माझ्या अंगरक्षकानं एका तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यानं माझ्या अंगरक्षकाला खाली पाडलं. त्यानंतर मी तरुणाला मारहाण केली. माझ्या आई-बहिणीच्या रक्षणासाठी 'मी' त्याला चोपल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळं तरुणांच्या मारहाणीचा मला अजिबात पश्चाताप होत नाही. सार्वजनिक कार्यक्रमात असा उपद्रव कोणी निर्माण केल्यास त्यांना देखील याच पद्धतीनं उत्तर देण्यात येईल, असं गायकवाड म्हणाले.

'त्या' जमिनीशी माझा काहीही संबंध नाही : माझ्या वक्तव्याच्या आधारे वनविभागानं गुन्हा नोंदवून माझ्या गळ्यातील वाघाचे दात जप्त केले होते. मात्र, दाताची तपासणी झाली असून तो दात वाघाचा नसल्याचा दावा संजय गायकवाड यांनी केला आहे. तसंच मोताळा तालुक्यातील जमीन ताब्यात घेतल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानं माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आला होता. त्या जमिनीचा वाद फिर्यादी उपाध्याय आणि चौबे यांच्यात असून, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असा खुलासा गायकवाड यांनी केलाय.

हे वाचलंत का :

  1. 'दादां'ना पीएमसी देईन, मात्र गृहखातं देणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी घेतली अजित पवारांची फिरकी
  2. शिंदे गॅंगमध्ये आता 'गॅंगवॉर' सुरू; संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला
  3. लोकसभा निवडणुकीपूर्वी गौतमनं घेतला 'गंभीर' निर्णय; सोशल मीडियावर केली घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.