ETV Bharat / state

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कापला तलवारीनं केक : तलवारीनं केक कापणं गुन्हा नसल्याचा दावा - MLA Sanjay Gaikwad - MLA SANJAY GAIKWAD

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा तलवारीनं केक कापतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर स्वत: संजय गायकवाड यांनी आपली भूमीका स्पष्ट केलीय. तलवारीनं केक कापणं गुन्हा नसल्याचा दावा त्यांनी केलाय.

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad
आमदार संजय गायकवाड (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 17, 2024, 4:03 PM IST

Updated : Aug 17, 2024, 6:36 PM IST

बुलढाणा MLA Cake Cutting Controversy : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड याचा वाढदिवस काल साजरा करण्यात आला. काल रात्री झालेल्या या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी मोठ्या तलवारीनं स्टेजवर वाढदिवसाचा केक कापला. त्यानंतर त्यांनी तो केक पत्नीसह मुलाला भरवला होता. या सर्व घटनेचा व्हिडिओ चर्चेत आहे.

संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

तलवारीनं कापला केक : सामान्य व्यक्तीनं तलवारीनं केक कापला, तर त्या व्यक्तीवर शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जातो. मात्र, आता शिवसेनेच्या आमदारानच तलवारीनं केक कापून पत्नी पूजा गायकवाड, तसंच त्यांच्या मुलाला केक भरवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळं आमदार संजय गायकवाड यांच्यावर बुलढाणा पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तलवारीनं केक कापणं गुन्हा नाही : या संपूर्ण प्रकरणावर आता खुद्द संजय गायकवाड यांनी भाष्य करत आपल्या कृतीचं स्पष्टीकरण दिलय. "तलवारीनं केक कापणं हा गुन्हा होऊ शकत नाही. तलवारीनं केक कापण्याचा हेतू कोणाचंही नुकसान करण्याचा नाही. यावर गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं" आमदार संजय गायकवाड यांचं म्हणणं आहे.

तलवारी देणं हे शौर्याचं प्रतीक : "नेत्यांना तलवारी देणं हे शौर्याचं प्रतीक मानलं. पोलीस परेडच्या वेळीही पोलीस तलवार दाखवतात, मग ते लोकांना धमकावता का? ऑलिम्पिकमधील तलवारबाजीचा खेळही बंद होणार का? आमच्या पूर्वजांपासून आम्ही तलवार चालवतो, म्हणून आम्ही तलवारीचा वापर करू. गैरवापरामुळं गुन्हा घडू शकतो". असं सांगून, आमदार संजय गायकवाड यांनीही अशा प्रकारे तलवार दाखवणं हा गुन्हा नसल्याचा अजब दावा केला आहे.

'हे' वाचलंत का :

  1. राजीव गांधींच्या जयंतीदिनी राहुल गांधी फोडणार प्रचाराचा नारळ; मात्र मुंबई पोलिसांनी घेतला आक्षेप - Rahul Gandhi Rally In Mumbai
  2. महाविकास आघाडीचा आर या पारचा नारा : "एक तर तू राहशील किंवा मी राहीन...", आघाडीनं फुंकलं विधानसभेचं रणशिंग - Maharashtra Assembly Election 2024
  3. दिल्ली दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडी सोपविणार मोठी जबाबदारी? काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा - Assembly Election 2024

Last Updated : Aug 17, 2024, 6:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.