मुंबई Minor girl raped : धारावी परिसरात घडलेली बलात्काराची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मुलीला एकटी पाहून आरोपीने घरात घुसून चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने ओळख लपवण्यासाठी मास्कचा वापर केला होता.
धारावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुलगी घरी एकटी असताना ५९ वर्षीय आरोपीने तिच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने हल्ला करून तिच्या मानेला दुखापत केली. आरोपीने चेहऱ्यावर मास्क घातला होता. त्यामुळे तरुणी त्याला सुरुवातीला ओळखू शकली नाही. मात्र, मुलीने विरोध केल्यावर मास्क उतरला आणि तिने त्याला ओळखलं.
पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि तिने आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीने आरोपीला ओळखताच आरोपीने तिला धमकी दिली की, हा प्रकार कोणाला सांगितला तर तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून तिला विद्रुप करण्यासही तो मागेपुढे पाहणार नाही.
मुलीच्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी आरोपीने कपाटात दागिने ठेवले आहेत की नाही याची तपासणी केली. मुलीचे कुटुंबीय घरी आल्यानंतर पीडित मुलीने तिच्या आईला घडलेल्या घटनेची माहिती दिली आणि धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रार दाखल झाल्यानंतर धारावी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 66(1) आणि 351(3) अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, पीडित मुलीची सायन रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून तिची प्रकृती स्थिर आहे.
हेही वाचा...
- इन्स्टाग्रामवरची मैत्री पडली महागात; तरुणीचे नग्न फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी
- धक्कादायक! विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून कोयत्यानं वार; सासरा, दीर अन् मामेभावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- तरुणानं लॉजवर नेऊन केला बलात्कार, हादरलेल्या पीडितेनं संपवलं जीवन; तर दुसऱ्या घटनेत नराधमानं दिव्यांग महिलेला केलं 'वासनेची शिकार'