ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गरोदर राहिल्यानं प्रकरण उघडकीस - Minor Girl Abuse Thane - MINOR GIRL ABUSE THANE

Minor Girl Abuse : एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीनं अत्याचार केल्याची घटना समोर आली. यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानं प्रकरण उघडकीस आलं.

Etv Bharat Stock photo
संग्रहित छायाचित्र (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 8:19 PM IST

ठाणे Minor Girl Abuse : एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घरात जबरदस्तीनं अत्याचार केल्याच्या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानं ही धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.

मुलीवर घरात घुसून अत्याचार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी मूळची नेपाळची असून ती आपल्या कुटुंबासह कामाच्या शोधात भारतात आली. पीडित कुटुंब कामाच्या शोधात असताना त्यांना बदलापूर पूर्व येथील इमारत बांधकामाच्या ठिकाणी काम तसंच निवारा म्हणून एक खोली देण्यात आली. त्याचवेळी जून महिन्यात अज्ञात आरोपीनं पीडित मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. तसंच तिला जीवे मारण्याची धमकी देत पळ काढला. धमकीच्या भीतीनं पीडितेनं आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती कोणालाही दिली नाही.

आरोपीचा शोध सुरु : काही दिवसांनी अल्पवीयन मुलीच्या पोटात त्रास होत असल्यानं तिला उल्हासनगरमधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात 19 जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून 20 जुलै रोजी कलम 376, (अ, ब ) सह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हे फरार नरधामाचा शोध घेत आहेत, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी सांगितलं. मात्र, गुन्हा दाखल होऊन 10 दिवस उलटून गेल्यानंतरीही अज्ञात नरधमाचा शोध लागत नसल्यानं पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

'हे' वाचलंत का :

  1. खिचडी देण्याच्या बहाण्यानं दिव्यांग मुलीला बोलावलं दुकानात अन्.... - Abusing Disabled Girl
  2. २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून निर्घृण खून; नातेवाईकांचा 'लव्ह जिहाद'चा आरोप - Girl Murder Case Uran
  3. 5 वर्षीय चिमुरडीवर 75 वर्षीय नराधमाचा अत्याचार; दोषीला 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा - Thane rape case verdict

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.