ETV Bharat / state

भाजपाकडून कुठलीच ऑफर नाही; अंजली दमानियांच्या सवालावर छगन भुजबळांचा पलटवार

Chhagan Bhujbal On Anjali Damania : मंत्री छगन भुजबळ यांना भाजपानं ऑफर दिली आहे का असा सवाल अंजली दमानिया यांनी 'एक्स'वर पोस्ट शेअर करत विचारला होता. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे. आपणाला कोणतीच ऑफर नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Chhagan Bhujbal On Anjali Damania
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 1:21 PM IST

Updated : Feb 2, 2024, 1:35 PM IST

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

नाशिक Chhagan Bhujbal On Anjali Damania : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अंजली दमानिया यांनी हल्लाबोल केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांना भाजपाची ऑफर आहे का, असा सवाल अंजली दमानिया यांनी 'एक्स'वर केला होता. त्यावर छगन भुजबळ यांनी यांनी पलटवार केला आहे. "भाजपाकडून मला कोणतीच ऑफर नाही, मात्र अंजली दमानिया यांना कुठून माहिती मिळाली, याबाबत मला माहिती नाही. मात्र मला कोणत्याही पदाची हौस नाही," अशी टीका अंजली दमानिया यांना छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे,

मला अजून भाजपच्या ऑफरबद्दल काही माहिती नाही : "अंजली दमानियांना कशी काय माहिती मिळाली? हे मला माहीत नाही. मला कुठल्या पदाचा हौस नाही. गेल्या 35 वर्षांपासून मी ओबीसी समाजासाठी काम करत आहे. ओबीसी प्रश्नांवर देशभर मी रॅली केल्या आहेत. यात नवीन काही मला पाहिजे, असं काही नाही. असं काही प्रपोजल मला आलेलं नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी काही घुसमट होत नाहीये," असं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो : "शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड जे म्हणाले, ते मी पण ते ऐकलं आणि वाचलं. ठीक आहे थोडं वाईट वाटलं. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार हा सामान्य जनतेला आहे. त्यामुळं तो आमदारांनादेखील आहे. याबाबत माझं काहीही म्हणणं नाही. परंतु जी भाषा त्यांनी वापरली, ती काही योग्य नाही. ते आताही शिवसेनेचे आहेत, म्हणजे पूर्वीही शिवसेनेतच असणार, मला त्यांना सांगायचं की, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. त्यांच्या वक्तव्याबाबत आता शिंदे साहेब पाहतील. ते म्हणाले की, कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रीमंडळाबाहेर काढा. मला मंत्रीमंडळात बाहेर काढायचं की ठेवायचं, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. संजय गायकवाड यांना कल्पना आहे की, त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे आणि इतर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचा नेता म्हणून मी काम केलेलं आहे," असा टोलाही छगन भुजबळ यांनी गायकवाड यांना लगावला.

बजेटमधून आरक्षण मागितलं : मनोज जरांगे हे पुन्हा आंदोलनाला बसणार आहेत. यावर छगन भुजबळ म्हणाले की, "जरांगे मोठे नेते आहेत, ते काहीही करू शकतात. ते कुठल्याही विषयावर आंदोलनाला बसू शकतात. तसा लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. काल त्यांनी मोदींना बजेटमधून आरक्षण देण्याची मागणी केली, हे मला कधी सूचलं नाही," असा टोलाही त्यांनी छगन भुजबळ यांनी लगावला.

हेही वाचा :

  1. देशातील सर्व घटकांना मदत करणारा सर्वसमावेश अर्थसंकल्प; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
  2. मराठ्यांनी ओबीसी बांधवांचा घास हिरावून घेतला, अधिसूचनेला विरोध; छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

Last Updated : Feb 2, 2024, 1:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.