विरार Shivsena Thane District Leader Son Died : विरारमधील सी बीच रिसॉर्टसमोर दोन गटात झालेल्या मारहाणीत शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचे यांचा मुलगा मिलिंद मोरे (वय 47) यांचा मृत्यू झाला. एका रिक्षाचालकानं मोरे यांच्या पुतण्याला धडक दिल्यानंतर वाद झाला. काही वेळातच वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर ही घटना घडली.
नेमकं प्रकरण काय : मिलिंद मोरे आपल्या कुटुंबासह सह 8 ते 10 जणांसोबत 'सेव्हन सी रिसॉर्ट 'मध्ये आले होते. यावेळी एका रिक्षाचालकानं मोरे यांच्या पुतण्याला धडक दिली. याचा जाब विचारताच मोरे आणि या रिक्षावाल्यामध्ये भांडणं झालं. रिक्षाचालकानं स्थानिकांच्या मदतीनं मिलिंद मोरे, त्यांचा भाऊ तसंच दोन मित्रांवर हल्ला करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत मोरे यांना घाव बसल्याने हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या मारहाणीची घटना रिसॉर्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नातेवाईकांकडून कारवाई मागणी : याप्रकरणी 20 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली. मिलिंद मोरे यांचं पार्थिव ठाण्यात आणण्यात येणार आहे. जवाहरबाग वैकुंठभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळं मिलिंद यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. रिक्षा चालकाबरोबरच मिलिंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी मोरे यांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.
हेही वाचा