ETV Bharat / state

144 वर्ष जुन्या ऐतिहासिक 'मारबत' उत्सवाला सुरुवात, जाणून घ्या काळ्या- पिवळ्या मारबतीचं महत्त्व - Nagpur Marbat Festival 2024 - NAGPUR MARBAT FESTIVAL 2024

Nagpur Marbat Festival 2024 : संत्री यापेक्षा नागपूर शहराची वेगळी ओळख सांगायचं झाल्यास देशातील 'मारबत' मिरवणारं एकमेव शहर म्हणजे नागपूर. या शहरानं 'मारबत' मिरवण्याची परंपरा जपलीय. त्यामुळं 'मारबत' मिरवणुकीच्या वेगळेपणासाठी नागपूर शहर देशभरात ओळखलं जातं.

Nagpur Marbat Festival 2024
मारबत उत्सव (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 5:49 PM IST

Updated : Sep 2, 2024, 6:15 PM IST

नागपूर Nagpur Marbat Festival 2024 : नागपूरमध्ये 144 वर्ष जुन्या ऐतिहासिक, पौराणिक व तसंच धार्मिक महत्त्व असलेला 'मारबत' उत्सव सुरू झालाय. 144 वर्षांपासून 'काळी मारबत' आणि 140 वर्षांपासून अविरतपणे प्रत्येक नागपूरकरांच्या श्रद्धास्थानी असलेली पिवळी 'मारबत' स्थानापन्न झालीय. पुढील काही हा दिवस 'मारबत' महोत्सव सुरू राहणार आहे. या उत्सवाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतं, कारण हा उत्सव केवळ नागपुरामध्येच साजरा केला जातो.

मारबत उत्सव (Source - ETV Bharat Reporter)

दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी : 'मारबत' उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा आहे. काळी आणि पिवळी मारबत सध्या विराजमान झालीय. त्यांचं दर्शन घेण्यासाठी नागपूरचं नव्हे तर राज्यातील इतरही भागातून भाविक येऊ लागले आहेत. पोळा सणाच्या चार दिवसांपूर्वी पिवळी आणि काळी मारबतची स्थापना केली जाते. सध्या या दोन्ही मारबत विराजमान झाल्या असून त्यांचं दर्शन घेण्यासाठी भाविक आता गर्दी करू लागले आहेत. पिवळी मारबतीला देवीचं रूप म्हणून पुजलं जातं. काळी मारबत ही दुर्जनांचं प्रतीक असल्याची मान्यता आहे.

ऐतिहासिक परंपरेचं जतन : धावपळीच्या युगात आपल्याला आपल्याच संस्कृतीचा विसर पडतोय, असं असताना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुर शहरानं 144 वर्षे जुन्या ऐतिहासिक परंपरेचं जतन केलंय. समाजातील अनिष्ट प्रथांचं उच्चाटन करण्याच्या हेतूनं बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढली जाते. काळी आणि पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात. 'मारबत' म्हणजे वाईट रुढी- परंपरा, अंधश्रद्धेच दहन करणं आणि चांगल्या परंपरा, विचारांचं स्वागत करणं हा या मागचा एक उद्देश. कृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचं प्रतीक 'काळी मारबत', तर लोकांचं रक्षण करणारी 'पिवळी मारबत' आहे. यांच्या दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात.

मारबत उत्सव म्हणजे काय? : जगभरात प्रसिद्ध झालेला बडग्या-मारबत उत्सव व मिरवणूक हा प्रकार फक्त नागपुरात बघायला मिळतो. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे. इंग्रजांची राजवट देशात असताना नागरिकांना एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीनं पुण्यात गणेशोत्सव सुरू केला, त्याच पार्श्वभूमीवर नागपुरातदेखील देखील 'मारबत' उत्सव सुरू करण्यात आला होता. 'मारबत' उत्सवाकडे गणेशोत्सवापेक्षा जुना उत्सव म्हणून पाहिले जातं. प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या. त्या मानव जातीसाठी घातक ठरत असल्यानं त्या रूढी परंपरांचं उच्चाटन व्हावं, म्हणून देखील हा उत्सव साजरा केला जातो. 'मारबत' उत्सव साजरा करण्यामागं एक उद्धिष्ट आहे. ते म्हणजे, वाईट रूढी परंपरा व अंधश्रद्धेचा दहन करून चांगल्या परंपरा आणि विचारांचं स्वागत करणं.

पिवळी मारबतीची परंपरा : नागपूरच्या जगनाथ बुधवारी भागात राहणाऱ्या तेली समाज बांधवांनी 'पिवळी मारबत' उत्सव 1885 साली साजरा करण्यास सुरुवात केली. यावर्षी पिवळ्या मारबतीला 140 वर्ष पूर्ण झाले आहेत. लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते. पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढल्यानंतर तिचं दहन केलं जातं. विशेष म्हणजे, लहान मुलांना घेऊन महिला दर्शनासाठी येतात.

काळी मारबतीची परंपरा : भोसले राजघराण्यातील बाकाबाई यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणी केली होती. त्याविरोधात 'काळी मारबत' काढली जाते, त्याच बरोबर 'काळी मारबती'ला महाभारताचा संदर्भ देखील दिला जातो. आज काळी मारबत या परंपरेला 144 वर्ष पूर्ण झाले आहेत.

हेही वाचा

  1. मुंबईचा 'MBA पानवाला'! लाख रुपये पगाराची नोकरी सोडून विकतोय पान; आता करोडोची कमाई - The Paan Story Mumbai
  2. विदर्भाची खास ओळख 'तान्हा पोळा'! 500 ते 3 लाख रुपयांपर्यंत नंदी बैल विक्रीसाठी उपलब्ध - Nagpur Tanha Pola Festival 2024
  3. ताशा कडाडला, ढोलही घुमला! 'नाशिक ढोल' पथकांचा आवाज देशात घुमणार; परराज्यातही क्रेझ, जाणून घ्या इतिहास - Nashik Dhol

Last Updated : Sep 2, 2024, 6:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.