ETV Bharat / state

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 2024 : मराठा समाजाची दिशभूल करणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन - Marathwada Mukti Sangram Din 2024 - MARATHWADA MUKTI SANGRAM DIN 2024

Marathwada Mukti Sangram Din 2024 : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. सरकार कधीही मराठा समाजाची फसवणूक करणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 2024 कार्यक्रमात बोलताना दिलं.

Marathwada Mukti Sangram Din 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 2:19 PM IST

छत्रपती संभाजीनगर Marathwada Mukti Sangram Din 2024 : सरकार मराठा समाजाची फसवणूक करणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 2024 निमित्त सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील असेल, असं आश्वासन दिलं. "अनेक योजना या भागासाठी सुरू केल्या असून दुष्काळवाडा ही ओळख पुसणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महायुतीमध्ये कुठलाही संघर्ष नसून सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे. जागा वाटपाबाबत बोलणी सुरू आहे. कामाच्या जोरावर जनता आम्हाला पुन्हा निवडून देईल," असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Marathwada Mukti Sangram Din 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Reporter)

मराठा समाजाची दिशाभूल करणारं नाही : मराठा आरक्षणासाठी अनेक घटक आंदोलन करत आहेत. त्यांना न्याय देताना दुटप्पी भूमिका घेणार नाही, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. "जस्टिस शिंदे यांची कमिटी आम्ही स्थापन केली. त्यानंतर कुणबी प्रमाणपत्र आता मिळत आहे, हे आतापर्यंत सर्वात मोठं यश आम्ही मानतो. त्यानंतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता दहा टक्के आरक्षण सरकारनं दिलं आहे. मात्र त्याच्या विरोधात आज कोण न्यायालयात गेलं ते पाहा. अजूनही आरक्षणाच्या मुद्द्यावर काम सुरू आहे, आमच्या पोटात एक आणि ओठात एक असं असणार नाही. समाजाची फसवणूक कुठल्याही प्रकारे आम्ही करणार नाही. आतापर्यंत 5 हजार मराठा मुलांना नोकरी दिली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळातून बिनव्याजी कर्ज देखील आम्ही देऊन युवकांना रोजगार निर्माण केला आहे. मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत, मात्र त्यांना एकच सांगतो, की आता त्यांनी सहकार्य करावं. ज्यांना आजपर्यंत आरक्षण देण्याची इतकी मोठी संधी असतानाही, त्यांनी ते दिलं नाही, त्यांना आता जाब तुम्ही विचारा," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार : "मागील वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 45 हजार कोटींच्या कामाची घोषणा केली होती. त्यात 29 हजार कोटींची काम पूर्ण झाली असून उर्वरित कामं अद्यापही सुरू आहेत. मराठवाड्यातील दुष्काळवाडा हा शब्द पुसण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, त्यासाठी वाहून जाणारं समुद्राचं पाणी गोदावरीला देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अनेक योजनांना निधी देण्यास आम्ही मागं पडणार नाही," असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त केलं. "दोन वर्षात आम्ही वेगानं निर्णय घेतले आहेत, समृद्धी सारख्या महामार्गानं मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. अनेक नवीन उद्योग आणत आहोत, रोजगार निर्मिती त्यानिमित्तानं निर्माण होणार आहे. आयटी पार्क, इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती, अशा प्रकल्पाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. देशातील 52 टक्के उद्योग हे राज्यात असून त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय," अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

लाडक्या बहिणीसह शेतकरी देखील लाडका : लाडकी बहीण योजना ही सर्वात यशस्वी योजना आम्ही राबवत आहोत. त्याचबरोबर युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी त्या प्रकारचं स्किल असलेला रोजगार हमी निर्माण करत आहोत. राज्यातील लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ दिली असून अडीच कोटी महिलांना मदत करण्याचं ध्येय आम्ही ठेवलं आहे. त्याचबरोबर नुसती लाडकी बहीण नाही, तर लाडका भाऊ आणि लाडका शेतकरी देखील आहे. त्यामुळे सोयाबीनला पाच हजारांचा भाव देण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. शेतकऱ्यांसाठी लाभदायी योजना राबवत असून कांद्याला देखील चांगला भाव मिळेल, यासाठी सरकार कठीबद्ध आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन - CM Eknath Shinde
  2. "कोरोना काळात ज्यांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, त्यांच्यापासून सावध राहा"-एकनाथ शिंदे - Eknath Shinde On Maha Vikas Aghadi
  3. महाराष्ट्रात येणार नमक हराम 2 चित्रपट; 'चित्रपटाची कथा, पटकथा मी देणार,' संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल - Sanjay Raut On Eknath Shinde

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.