नाशिक Nashik Road Accident : एसटी बस आणि अल्टो कारच्या अपघातात तीन जण ठार झाले. ही घटना नांदगाव शहरातील गंगाधरी जवळ आज सकाळी घडली. या घटनेत एक 2 वर्षीय बालक गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी नाशिक इथं हलवण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं. वंदना संतोष नलावडे ( वय 40 वर्ष ) शुभम संतोष नलावडे ( वय 23 वर्ष ) निकिता मनोज शिंदे ( वय 22 वर्ष ) असं मृतांचं नाव आहे. तर वेदांत मनोज शिंदे असं या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे.
एसटी बस आणि कारचा भीषण अपघात : नांदगाव बस डेपोची चाळीसगाव नांदगाव एसटी ( क्रमांक एम एच 14 बीटी 4498 ) आणि अल्टो कार ( क्रमांक एम एच 15 सीडी 2057 ) ही भगूर इथून भडगावकडं जात असताना समोरासमोर धडकली. या अपघातात अल्टो कारमधील वंदना संतोष नलावडे आणि निकिता मनोज शिंदे यांच्यासह शुभम संतोष नलावडे यांचा मृत्यू झाला. या अपघातात वेदांत मनोज शिंदे या तीन वर्षीय बाळ गंभीर जखमी झालं असून त्याला पुढील उपचारासाठी नाशिक इथं हलवण्यात आलं आहे. या अपघाताचं वृत्त समजताच आमदार सुहास कांदे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केलं.
आमदार सुहास कांदे यांची अपघातस्थळी मदत : नांदगाव येथील एसटी आणि कार अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुहास कांदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसह मदत कार्य सुरू केलं, तसेच प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या.
हेही वाचा :