गोंदिया : जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आज दुपारी झालेल्या शिवशाही बस अपघातात एकूण आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन प्रवासी गंभीर जखमी असून, 26 प्रवासी किरकोळ जखमी आहेत. सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात उपचार सुरू आहे. 11 मृतकांपैकी 9 मृतांची ओळख पटली असून, अन्य 2 मृतकांची ओळख अद्यापही पटलेली नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली.
केंद्राकडून आर्थिक मदत जाहीर : प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत केंद्र सरकारनं जाहीर केली. PMNRF फंडातून ही आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती 'पीएमओ'नं दिली.
मृतांची नावं :
1) स्मिता सूर्यवंशी (32) रा. मोरगाव अर्जुनी (पोलीस कर्मचारी)
2) मंगला राजेश लांजेवार (60) राहणार पिपरी जिल्हा भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार राहणार पिपरी जिल्हा भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे (65) राहणार वरोरा जिल्हा चंद्रपूर..
5) रामचंद्र कनोजे (65) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा..
6) अंजिरा रामचंद्र रामचंद्र कनोजे (60) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा
7) आरिफ अजहर सय्यद (42) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
8) अजहर अली सय्यद (55) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
9) नयना विशाल मिटकरी (35) राहणार बेसा जिल्हा नागपूर
10) अनोळखी पुरुष
11) अनोळखी पुरुष
"अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते. जवळपास 25 ते 28 प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमधील एक नागपूरचा, एक चंद्रपूरचा तर काही भंडारा आणि इतर गोंदियामधील रहिवासी आहेत." - प्राजित नायर - जिल्हाधिकारी, गोंदिया
Distressed by the loss of lives in the bus mishap in Gondia, Maharashtra. Condolences to those who lost their loved ones. May the injured recover soon. The local administration is assisting those affected.
— PMO India (@PMOIndia) November 29, 2024
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin…
खजरी गावाजवळ दुचाकीला वाचवताना झाला अपघात : नागपूरवरुन गोंदियाला येणारी शिवशाही बस आज दुपारी 12 ते 12.30 च्या सुमारास गोंदियातील कोहमारा राज्य महामार्गावरील खजरी गावाजवळून जात होती. यावेळी वळणावर अचानक एक दुचाकीस्वार भरधाव आला. या दुचाकीस्वाराला वाचवताना शिवशाही बस क्रमांक एमएच 09, ईएम 1273 ही वळणावर उलटून भीषण अपगात जाला. या अपघातात तब्बल 11 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्यानं मोठी खळबळ उडाली. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवशाही बसमध्ये 35 पेक्षा जास्त प्रवासी : खजरी या गावाजवळ झालेल्या अपघातात शिवशाही बसमधील 11 प्रवासी ठार झाले असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर बचावकार्य सुरू केलं. या बसमध्ये तब्बल 35 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. घटनास्थळावर प्रवाशांनी मोठा आक्रोश केला.
अपघातानंतर चालकानं काढला पळ : शिवशाही बसचा अपघात घडल्यानंतर घटनास्थळावर मोठा जमाव जमला. प्रवाशांच्या आक्रोशानं अनेक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र अपघात घडल्यानंतर शिवशाही बसच्या चालकानं घटनास्थळावरुन पळ काढला. नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी जखमी प्रवाशांना जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. अपघातग्रस्त बसला बाजुला करण्याचे प्रयत्न घटनास्थळावर सुरू आहेत. अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती प्रशासनानं दिली.
हेही वाचा :