छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Manoj Jarange Patil Shantata Rally : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या शांतता रॅलीचा शनिवारी (13 जुलै) छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप झाला. यावेळी बोलत असताना,"20 तारखेला पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहे, " असा इशारा दिला. " त्याच दिवशी उमेदवारांना पाडायचं की उभं रहायचं हे ठरवण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची पुढील दिशादेखील त्याच दिवशी ठरवण्यात येईल," असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
आमच्या नऊ मागण्या पूर्ण करा : " सरकारनं आमच्याकडं एक महिना मागितला होता. एक महिना आता पूर्ण झालाय. त्यामुळं आता आम्ही पुन्हा वेगळ्या पद्धतीनं आमच्या आंदोलनाला सुरुवात करू," असं इशारा मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिलाय. "सरकारनं आम्ही केलेल्या नऊ मागण्या पूर्ण कराव्यात. शिंदे-फडणवीसांनी समजून घ्यावं. त्यांनी छगन भुजबळ यांच्या नादी लागू नये. काही ठिकाणी ताकद नाही तर डोकं पण लावलं पाहिजे. ते मला जसं समजत होते, तसा मी नसल्याचं त्यांना कळलंय. समाज फसला तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करणार नाही. छगन भुजबळ माझ्यावर टीका करतात. तसंच इतर सोशल मीडियावर माझ्याविषयी चुकीचं लिहिलं जातं. पण मराठ्यांसाठी छाताडावर बसून आरक्षण घेतलं की नाही?," असा सवाल त्यांनी केला.
विधान परिषदेत निवडून आले म्हणून आम्हाला त्रास देऊ नका : " विधान परिषदेत सर्व मराठ्यांच्या मतांवर निवडून आलेत. मतदान करणाऱ्या आमदारांनी निवडून आलेल्या आमदारांना फोन करुन जातिवाद करू नका, असं सांगावं. आमचं मत घेऊन आमच्या लोकांच्या घरासमोर जाऊन जल्लोष करू नका," असा इशारा त्यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांना दिला. विधान परिषदेत निवडून आलेल्या उमेदवारांनी त्रास दिला तर त्यांना मतदान करणाऱ्या आमदारांना आम्ही पाडणार असल्याचंही ते म्हणाले. पुढं ते म्हणाले की, "भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांना एकत्र घेऊन मला उघडं पाडण्याचा प्रयत्न केला. सरकारनंदेखील तेच केलं. आमच्या आंदोलनाला परवानगी मिळत नव्हती. पण त्यांना परवानगी मिळाली."
हेही वाचा -
- बीडमध्ये मनोज जरांगे पाटील सरकारवर कडाडले!; छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचा घेतला समाचार - Manoj Jarange Patil
- बीडमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली; सर्व शाळांना सुट्टी जाहीर - Manoj Jarange Patil Shantata Rally
- मला गोळ्या घातल्या तरी मी कुणाच्या बापाला भीत नाही; अंतरवालीत घिरट्या घालणाऱ्या ड्रोनवर जरांगे यांची प्रतिक्रिया - Manoj Jarange Patil