मुंबई Manoj Jarange Patil On OBC : मनोज जरांगे पाटील मराठा महोत्सवात मंत्री छगन भुजबळांविषयी बोलले की, ग्रामीण भागातील ओबीसींना माझा विरोध नाही; मात्र त्याला सुट्टी नाही. तो गप्प बसत नाही तर मी कशाला सोडू? तो गोरगरिबांचा नाही, मराठ्यांचा नाही आणि कोणाचाही नाही. (Maratha Festival) मी एका सर्वसामान्य घरातून आलेली व्यक्ती आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी काम करतोय. राजकारणात जाणार का? या प्रश्नावर राजकारण लय लांब गेलंय. मी व्यासपीठाच्या खुर्चीवर बसेन; पण राजकीय नको, असंही स्पष्टीकरण जरांगेंनी दिलय.
मराठा समाजाच्या कुणबी नोंदी जुन्याच : मराठा समाजाच्या कुणबी नोंदी जुन्याच आहेत आणि जुन्या नोंदी असतील म्हणून त्या सापडतील ना? आमच्या जुन्याच नोंदी नव्यानं सापडल्या आहेत, असंही जरांगे पाटील म्हणाले. आतापर्यंत 57 लाख मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी आल्या असून तब्बल 2 कोटी मराठा बांधव हे आरक्षणाच्या कक्षेत आले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आणि आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही भरती करू नका. केली तर मराठा समाजासाठी जागा रिक्त ठेवा, असं मी महिनाभरापूर्वी सांगितलं होतं. आता फक्त शिकून मोठे व्हा! असा मराठा समाजाच्या युवकांना मनोज जरांगे पाटील यांनी संदेश दिला.
सोशल मीडियावर निव्वळ अफवाच : सोशल मीडियावर मराठा आंदोलनासंबंधी अफवा पसरवल्या जात आहेत. बहुदा ती मंत्री भुजबळांची माणसं असावीत. तसेच सोशल मीडियावरील लोकांना द्वेष पसरवण्याशिवाय दुसरा उद्योगच नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाज अनेक वर्षानंतर एकत्र झाला आहे. त्यामुळे गैरसमज पसरवू नका. आपले मतभेद सोडून द्या. तुमच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी मतभेद नको असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तर मराठा समाज वैभवशाली होईल : मराठा समाजाकडे प्रचंड खरेदी शक्ती आहे. दर महिन्याला वीस ते पंचवीस हजारांची खरेदी करतात. लाखोंची उलाढाल आहे. 'ब्रँडिंग' आणि 'बॉण्डिंग' या दोन शब्दांमध्ये मराठा महोत्सव आहे. येणाऱ्या काळात मराठा समाज वैभवशाली होईल, असा विश्वास मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे नांगर, तलवार, तराजू ह्या तिन्ही वस्तू आहेत. त्यामुळे त्यांच्या हातात यावेळी नांगर देऊन बळीराजाच्या घोषणा देण्यात आल्या.
हेही वाचा: