ETV Bharat / state

माझं कुटुंब उद्याला जिवंत नसलं तरी मी बाजूला हटणार नाही- मनोज जरांगे पाटील - Manoj Jarange Patil - MANOJ JARANGE PATIL

Manoj Jarange News : छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या सभेत बोलत असताना "माझ्या कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव सरकारकडून आखला जातोय", असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील (reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 7:41 AM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Manoj Jarange News : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नेतृत्व केलं. यानंतर आताही राज्यातील अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटील दौरे करत असून मराठा समाजाशी संवाद साधत आहेत. तसेच अनेक सभांमध्ये संबोधित करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा झाल्यानं मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर गुरुवारी (23 मे) छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथे पार पडलेल्या सभेत बोलत असताना माझ्या कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव आखला जातोय, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? : यावेळी बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले की, "माझ्या कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव आखला जातोय. इतकं नीच सरकार कधी पाहिलं नाही. मी डावाला लागलो, आता माझं कुटुंब लागलं. माझं कुटुंब उद्याला जिवंत नसलं तरी मी बाजूला हटणार नाही. मी माझ्या बापाला आणि बायकोला अगोदरच सांगितलंय की डोळ्यात पाणी आणू नका. मी गेलो तरी माझ्या बापाला तीन मुलं आहेत. माझं रक्षण करायला माझा समाज आहे. काही झालं तरी शांत राहा. उपोषणामुळं शरीर साथ देत नाही म्हणून तुम्हा सर्वांना जबाबदारी देतो. मी तुमच्यात असो किंवा नसो तरी समाज फुटू देऊ नका." "तसंच राजकीय लोकांसाठी फुटू नका. आमरण उपोषण होणारच," असा इशाराही जरांगे यांनी दिला.

भुजबळांवरही साधला निशाणा : पुढं ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत जरांगे म्हणाले की, "आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय. इतके दिवस इतरांनी खाल्लं आता आम्हाला द्या. तो एक नेता म्हणतो, आता आरक्षणाची एसटी फुल झाली. एसटी फुल असेल तर दार उघडून दाखवा. जर नाही दाखवलं तर ओबीसीमधूनच आरक्षण घेऊ. कारण ती बस आतमधून रिकामीच आहे", अशी टीका जरांगे यांनी केली.

कारवाई केली तरी मागे हटणार नाही : "मी यांच्याकडून मॅनेज होत नाही. ना पैशांनी, ना पदानं, म्हणून माझ्यावर सरकारला कारवाई करायची आहे. माझ्यावर चौकशी समिती नेमली गेली. पण मला तडीपार केलं तर दुसऱ्या राज्यातील मराठे एकत्र करून आंदोलन करतील. जेलमध्ये टाकलं तर कैदी एकत्र करून आतमध्ये मोर्चा काढेल, पण मी थांबणार नाही", असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.

आता माघार नाही : पुढं ते म्हणाले की, "मी मराठा समाजसह इतर समाजाचं भांडण कमी केलं तरी मला जातीवादी म्हणलं जातंय. यांचे लेकरं विदेशात जाऊन मोठे होतात आणि आपले पोरं शेतात जातात. लेकरांवर होणारा अन्याय लक्षात ठेवा. नेत्यांनी जातीच्या विरोधात जाऊ नय. निवडणूक येईल जाईल. मात्र त्यांनी समाजाच्या सोबत रहावं." 4 जून रोजी अंतरवली येथे पुन्हा आंदोलनाला बसणार असल्याचंही जरांगे यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा -

  1. तर विधानसभा लढविणारच, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा - Manoj Jarange Patil
  2. मराठ्यांना न्याय मिळाला नाही तर पुन्हा मैदानात उतरणार...; मनोज जरांगेंनी उपसलं उपोषणाचं हत्यार - Maratha Reservation
  3. "मराठा आरक्षणात सगेसोयऱ्यांना विरोध करणाऱ्यांना असं पाडा की...", मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन - Manoj Jarange Patil Appeal

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.