नागपूर : वर्ष सरताना नागपुरात गुन्हेगारी पुन्हा उफाळून आली आहे. कौटुंबीक वादातून मामानं दोन भाच्यांचा भररस्त्यात खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर शहरातील गांधीबाग परिसरात काली माता मंदिरासमोर मध्यरात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांड घडलं आहे. रवी राठोड आणि दीपक राठोड अशी हत्या झालेल्या दोन्ही भाच्यांची नावं आहेत. तर बदलसिंग राठोड असं आरोपी मामाचं नाव आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
भावाला वाचवताना तरुणाचा मृत्यू : मृतक रवी आणि जखमी दीपक हे सख्खे भाऊ आहेत. दोघांचाही मागील काही दिवसांपासून मामा बदलसिंग याच्या सोबत वाद सुरु होता. रात्री मामानं आपला भाचा रवी वर काली माता मंदिरासमोर चाकुनं जीवघेणा हल्ला करून त्याला संपवलं. रवीला वाचवण्यासाठी गेलेल्या दीपकवर सुद्धा आरोपी बदलसिंग राठोड यानी हल्ला केल्यामुळे दीपक गंभीर जखमी झाला.
जखमी दीपकचा उपचारादरम्यान मृत्यू, पाच आरोपींनी केला हल्ला : रविवारी रात्री नागपूरच्या गांधीबाग परिसरात दोन भावांवर झालेल्या हल्ल्यात जखमी असलेल्या दीपक राठोडचा सुद्धा मृत्यू झालाय. रवी राठोडचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. रवी आणि दीपक काल रात्री गांधीबाग परिसरातील कालीमाता मंदिरासमोर उभे असताना त्यांचा मामा बदलसिंग राठोडनं त्याचे दोन मुलं सोनू आणि अभिषेक यांच्यासह इतर दोन आरोपींच्या मदतीनं त्यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी बदलसिंह राठोड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चाकू आणि इतर धारदार शस्त्रांनी रवी राठोडची हत्या केली होती, तर दीपक राठोडला गंभीर जखमी केले. दीपक राठोडचा रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटेच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पैश्याच्या वादातून झाली हत्या : रवी आणि दीपक राठोड यांची हत्या ही अवघ्या काही हजार रुपयांच्या वादातून झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपी बदलसिंह राठोड याचा इतवारी परिसरात बांगड्या विकण्याचा व्यवसाय आहे. त्याच्याकडून रवी आणि दीपक या दोन्ही भावांनी काही हजार रुपयांच्या बांगड्या विकण्यासाठी घेतल्या होत्या, मात्र पैशाची परतफेड केली नव्हती. त्यामुळे राठोड बंधूंचे बदलसिंह राठोड सोबत गेले अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. त्याच वादातून बदलसिंह राठोडनं काल रात्री आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून दोन्ही भावांची हत्या केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पाच दिवसात सात हत्या झाल्यानं नागपूर हादरलं : नागपूर शहरातील हत्यासत्र काही केल्या थांबत नाही, असं दिसत आहे. गेल्या 5 दिवसात शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या परिसरात 7 हत्येच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये रविवारी रात्री झालेल्या राठोड बंधूच्या दुहेरी हत्याकांडाचा देखील समावेश आहे. रविवारी भरदिवसा आणखी एकाची हत्या करण्यात आली. ही घटना जरीपटका ख्रिश्चन कब्रस्थान येथे घडली आहे. रमेश शेंडे असे खून झालेल्या चौकीदाराचे नाव आहे. यापूर्वी, गुरुवारी, शुक्रवारी अजनी आणि धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या घटना घडल्या होत्या. या हत्यासत्रामुळे नागपूर शहर हादरलं आहे.
हेही वाचा :
- मामे बहिणीशी असलेल्या प्रेम संबंधावरून तिघांनी केली तरुणाची हत्या, आरोपी अटकेत - Nagpur Murder News
- दारू पार्ट्यांमुळे पुरुषोत्तम पुट्टेवार 'हिट अँड रन' सुपारी किलिंग हत्या प्रकरणाचा झाला उलगडा - Nagpur Murder Case
- वकिलाने मुलाच्या मदतीने पक्षकार मित्राची केली हत्या, आरोपींना अटक - lawyer killed friend