ETV Bharat / state

दुहेरी हत्याकांडानं अमरावती हादरली; जागेच्या वादातून शेजाऱ्याकडून आई, मुलाचा खून - Amravati Double Murder Case - AMRAVATI DOUBLE MURDER CASE

Amravati Double Murder Case : शेजाऱ्यांसोबत असलेल्या जागेच्या वादातून अमरावतीत दुहेरी हत्याकांड घडलं आहे. शेजाऱ्यानं सब्बलनं आई आणि मुलावर वार केले. यात दोन्ही मायलेकरांचा मृत्यू झाला.

Amravati Double Murder Case
घटनास्थळी दाखल झालेले पोलीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 1:58 PM IST

अमरावती Amravati Double Murder Case : गत काही दिवसांपासून शेजाऱ्यांमध्ये घरालगत असणाऱ्या खुल्या जागेवरुन वाद सुरू होता. या वादातून सोमवारी सायंकाळी आई आणि मुलाची लोखंडी सब्बलनं वार करुन खून करण्यात आला. अमरावती शहरातील मंगलधाम कॉलनी परिसरात असणाऱ्या बालाजी नगर इथं हे हत्याकांड घडलं. कुंदा देशमुख आणि सुरज देशमुख असं हत्या करण्यात आलेल्या आई आणि मुलाचं नाव आहे. तर देवानंद लोणारे असं दुहेरी हत्याकांड करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.

दोन कुटुंबात जागेचा वाद : मंगलधाम कॉलनी परिसरातील बालाजी नगर इथं विजय देशमुख हे पत्नी कुंदा आणि मुलगा सुरज यांच्यासोबत राहतात. सुरज देशमुख हा एमआयडीसी इथं कामाला आहे. त्यांच्या शेजारी मोबाईलचा व्यवसाय करणारे देवानंद लोणारे हे राहतात. देशमुख आणि लोणारे कुटुंबामध्ये गत अनेक दिवसांपासून त्यांच्या घरालगत असणाऱ्या खुल्या भूखंडावरून वाद आहे. या वादातूनच सोमवारी पाच वाजेच्या सुमारास सुरज देशमुख हा एमआयडीसी येथून कामावरून परतला असताना देवानंद लोणारे यांनी त्याच्यासोबत वाद घातला.

अशी घडली दुहेरी खुनाची घटना : देवानंद लोणारे याच्या हल्ल्यात सुरज देशमुख गंभीर जखमी झाला असताना त्याचा आवाज ऐकून त्याची आई कुंदा देशमुख यादेखील घराबाहेर आल्या. यावेळी देवानंद लोणारे यानं कुंदा देशमुख यांच्या डोक्यात लोखंडी सब्बलनं वार केला. या घटनेत आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले. कुंदा देशमुख आणि सुरज देशमुख रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना घरात असणारे विजय देशमुख घराबाहेर आरडाओरड ऐकून बाहेर आले. त्यावेळी देवानंद लोणारे यानं विजय देशमुख यांच्यावर देखील सब्बलनं वार केला. या हल्ल्यात विजय देशमुख जखमी झाले. या घटनेबाबत परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच पोलीस तत्काळ घटनास्थळी धावून आले. पोलिसांनी तिघांनाही उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी कुंदा देशमुख आणि सुरेश देशमुख यांना मृत घोषित केलं.

दुहेरी हत्याकांड करुन मारेकरी फरार : कुंदा देशमुख आणि त्यांचा मुलगा सुरज देशमुख यांच्यावर सब्बलनं वार करुन ठार मारणारा आरोपी देवानंद लोणारे हा या घटनेनंतर पसार झाला. त्यानं आपली पत्नी आणि मुलासह दुचाकीवर बसून पसार झाला. आई आणि मुलाच्या हत्याकांडामुळे अमरावती शहरात खळबळ उडाली. पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त कैलास फुंडकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा आढावा घेतला. फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपी देवानंद लोणारे याचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा :

  1. प्रेम प्रकरणात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनं केला खून; अमरावतीत नेमकं काय घडलं?
  2. Amravati Murder case :धारदार शस्त्राने वार करून दोघांची हत्या, पोलिसांनी घटनास्थळी दिली भेट
  3. Umesh Kolhe Murder Case उमेश कोल्हे हत्याकांड आरोपी शमीम अहमदवर 2 लाख रुपयांचे बक्षीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.