ETV Bharat / state

आईस्क्रीममध्ये सापडलं चक्क माणसाचं बोट, मालाड पोलिसांनी कंपनीविरोधात दाखल केला गुन्हा - HUMAN FINGER INSIDE IN ICE CREAM - HUMAN FINGER INSIDE IN ICE CREAM

Human Finger Inside an Ice cream : मुंबईतील मालाड भागात धक्कादायक घटना घडली आहे. एका डॉक्टरनं खाण्यासाठी आईस्क्रीम ऑर्डर केली होती. मात्र, आईस्क्रीम खाताना त्यात चक्क माणसाचं बोट आढळलं. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

Human Finger Inside an Ice cream
Human Finger Inside an Ice cream (Source reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 11:03 AM IST

Updated : Jun 13, 2024, 1:23 PM IST

मुंबई Human Finger Inside an Ice cream : ऑनलाईन आईस्क्रीम ऑर्डर करताय तर सावधान! कारण मालाडमध्ये एका एमबीबीएस डॉक्टरला ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये चक्क माणसाच्या बोटाचा तुकडा सापडलाय. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून यम्मो आईस्क्रीम कंपनी विरोधात भारतीय दंड संविधान कलम 272 ,273 आणि 336 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट फॉरेन्सिककडं पाठवल्याची माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणे यांनी दिली आहे.

तक्रारदाराची आणि पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणे यांची प्रतिक्रिया (Source reporter)

नेमकं काय घडलं : मालाडचा रहिवाशी असलेल्या ओर्लेम ब्रेन्डन सेराओ या डॉक्टरनं ऑनलाईन डिलिव्हरी ॲपवरून बटर स्कॉच आईस्क्रीमचे कोन मागवले होते. आईस्क्रीम खाताना तोंडात साधारण दोन सेंटिमीटर लांब बोटाचा अवशेष आला. एमबीबीएस डॉक्टर असलेल्या ओर्लेमला हा अवशेष मानवी बोट असल्याचा संशय आला. त्यानं याबाबत मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी आता मालाड पोलीस ऑनलाईन डिलिव्हरी ॲप तसंच आईस्क्रीम उत्पादकाची चौकशी करणार आहेत. यम्मो आईस्क्रीम कंपनीच्या आईस्क्रीमची देखील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केली जाणार असून आईस्क्रीम कंपनीची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मी तीन आईस्क्रीमचे कोन ऑर्डर केले होते. त्यातील एक बटर स्कॉच आईस्क्रीम होती. आईस्क्रीम खात असताना तोंडात एक तुकडा आला. अगोदर मला वाटलं की तो आईस्क्रीमचाच काही घटक असेल. मात्र, जेव्हा मी तो तुकडा नीट बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा मांसाचा तुकडा आहे आणि त्याला नख देखील आहे. त्यामुळं मला तो मानवी बोट असल्याचा संशय आला. हे बघून मी फार घाबरलो. त्यानंतर पोलिसांना पुरावा दाखविण्यासाठी मी तो तुकडा बर्फात ठेवला- डॉ. ओर्लेम ब्रेन्डन सेराओ, तक्रारदार

संशयास्पद खून नसल्याचा पोलिसांचा दावा : आईस्क्रीममध्ये बोट सापडण्याचा प्रकार संशयास्पद खून नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. कामगाराच्या बोटाला जखम झाल्यानंतर ते बोट मशिनमधील आईस्क्रीमध्ये पडलं असावं, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तर आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलंय.

हेही वाचा -

  1. Fake Desi Ghee : बनावट देशी तूप बनवणाऱ्या पाच जणांना चक्क जन्मठेपेची शिक्षा!
  2. Milk Adulteration : पांढर्‍या दुधाचा काळाबाजार; गुन्हे शाखेच्या कारवाईत 1040 लिटर भेसळयुक्त दूध जप्त
  3. Food Administration Department Raid : गेवराई शहरात 2 लाख 32 हजारांचे सुट्टे भेसळयुक्त तेल जप्त; अन्न प्रशासन विभागाची कारवाई

Last Updated : Jun 13, 2024, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.