ETV Bharat / state

'धर्मवीर'नंतर एकनाथ शिंदेंनाही 'मला काही सांगायचंय..'; नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - CM Eknath Shinde

CM Eknath Shinde : राज्याच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडी आता रंगमंचावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित 'मला काही सांगायचंय' या नावाचं नाटक लवकरच प्रदर्शित होणार आहे. आगामी विधानसभेच्या तोंडावर हे नाटक शिंदेंची राजकीय खेळी नेमकी कशी दाखवणार याबाबतची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2024, 6:05 PM IST

मुंबई CM Eknath Shinde : राज्याच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी सर्वात मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपासोबत सरकार स्थापन केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या या सत्तांतरानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना फुटीची कथा आता रंगमंचावर येणार आहे. 'मला काही सांगायचंय' हे सव्वा तासाचं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळं 'धर्मवीर' चित्रपटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं 'मला काही सांगायचंय' हे नाटक कसं असणार? यात काय दाखवलं जाणार आहे? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय.

महाराष्ट्राचं राजकारण रंगमंचावर : 'मला काही सांगायचंय' या नाटकाचं दिग्दर्शन अशोक समेळ हे करणार असून, त्यांचे पुत्र आणि अभिनेता संग्राम समेळ एकनाथ शिंदेंच्या मुख्य भूमिकेत असणार आहेत. 31 ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यावर आधारित 'कर्मयोगी' हे पुस्तक प्रकाशित झालं. यानंतर आता एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून जे बंड केलं होतं, त्या बंडावर आधारित 'मला काही सांगायचंय' हे नाटक येणार आहे. 'मला काही सांगायचंय' हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती संग्राम समेळ यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली. त्यामुळं आता महाराष्ट्राच्या राजकारणातील खेळी रंगमंचावर दिसणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 'मला काही सांगायचंय' : याच महिन्यात 'धर्मवीर पार्ट टू' हा चित्रपट येणार आहे. तर ऑगस्ट महिन्यात एकनाथ शिंदे यांच्यावर कर्मयोगी हे पुस्तक प्रकाशित झालं. यानंतर आता एकनाथ शिंदेंच्या बंडावर 'मला काही सांगायचंय' हे नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येणार असल्यामुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जाताहेत.

हेही वाचा

  1. 'माहेरची साडी'च्या प्रदर्शनाला 33 वर्ष पूर्ण, गुणी 'ट्रॅजेडी क्वीन' अलका कुबल नाही तर 'ही' अभिनेत्री होती निर्मात्याची पहिली पसंत - Maherchi Sadi Completed 33 Years
  2. 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3'ला दिवाळीच्या दिवशी होणार प्रदर्शित, अजय-कार्तिकची बॉक्स ऑफिसवर टक्कर - singham again
  3. बीबी करन्सी मिळविण्यात अरबाज पटेल आणि जान्हवी किल्लेकर झाले अयशस्वी, प्रोमो व्हायरल - Bigg Boss Marathi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.