ETV Bharat / state

जागावाटपाबाबत अजित पवारांचा डाव, शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर होणार का कमी? - Mahayuti Seat Sharing

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 3:26 PM IST

Mahayuti Seat Allocation : विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं साठ जागांवर दावा केलाय. मात्र, यामुळं महायुतीतील दुसरा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे पक्षावर नैतिक दबाव येऊन त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा हा प्रयत्न असावा अशी चर्चा सुरू झाली आहे. तर यामुळं आपल्या पक्षाच्या मागणीवर काहीही फरक पडणार नाही, असा दावा शिवसेना शिंदे पक्षानं केलाय.

Mahayuti seat sharing for Assembly Election 2024 Eknath Shinde Shivsena and Ajit Pawar NCP Seat Allocation
महायुती जागावाटप (ETV Bharat)

मुंबई Mahayuti Seat Allocation : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटप संदर्भात चर्चेच्या फेऱ्या घडत असतानाच घटकपक्षांनी आपापल्या ताकदीनुसार जागांची मागणी केली आहे. महायुतीच्या घटक पक्षातील मुख्य पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानं 160 जागांची मागणी केली असून अन्य पक्षांनी उरलेल्या जागा वाटून घ्याव्यात असा भाजपाचा आग्रह आहे. शिवसेना शिंदे गटानं 100 जागांवर दावा केला आहे. मात्र, त्याचवेळी सुरुवातीला शंभर जागांवर दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आता 60 जागा लढवण्यावर संमती दर्शवली आहे. अजित पवार यांनी यासंदर्भात स्पष्टता दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस 60 जागांवर लढणार हे निश्चित झालय. मात्र, या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला किती जागा येणार आणि महायुतीतील अन्य घटक पक्षांना किती जागा मिळणार? हा नवीन प्रश्न निर्माण झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेमुळं आता शिवसेना शिंदे पक्षाची बार्गेनिंग पॉवर आपसूक कमी झाली आहे का? असा नवीन प्रश्न निर्माण झालाय.

शिवसेना शिंदे गटाचे सहप्रमुख प्रवक्ते डॉ राजू वाघमारे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

आमच्या ताकदीवर काहीही परिणाम नाही : या संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शिवसेना शिंदे गटाचे सहप्रमुख प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे म्हणाले, "अजित पवार यांनी 60 जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केलय. कदाचित त्यांच्या पक्षात तेवढ्याच जागा लढवण्याची ताकद असावी. त्यामुळं त्यांनी त्यांच्या कुवतीनुसार जागांची स्पष्टता केली आहे. आमच्या पक्षाची ताकद ही त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळं आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. अजित पवार यांनी केलेल्या मागणीमुळं आमच्या पक्षाच्या बार्गेनिंग पॉवरवर कुठलाही परिणाम झालेला नाही. आमची महाराष्ट्रात असलेली ताकद पाहता आम्ही आमच्या वाट्याच्या जागांवर ठाम आहोत आणि त्याबाबत आमचे वरिष्ठ निर्णय घेतील", असंही वाघमारे यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे म्हणाले, "महायुतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कुरबुरी सुरू असल्याचं दिसतंय. तीनही मुख्य घटक पक्ष परस्परांवर आरोप करताना दिसत आहेत. अजित पवार यांनी सुरुवातीला शंभर जागांची मागणी केली होती. मात्र, त्यांनी अचानक 60 जागांवर संमती दर्शवली आहे. तर भारतीय जनता पक्ष सुरुवातीला 200 जागा लढवणार असं सांगत असताना भारतीय जनता पक्षानंही नंतर आलेल्या काही सर्वेक्षणामुळं 160 जागा लढवण्याबाबत निर्णय घेतल्याचं समजते. जर भारतीय जनता पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम राहिला तर शिवसेना शिंदे पक्षाला आपसूकच 60 जागांच्या आसपास जागा मिळतील. कारण, त्यांच्यासोबत अन्य घटक पक्षही आहेत. त्यांना प्रहार, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, शिवस्वराज्य, जानकर यांचा रासप या पक्षांसाठीही काही जागा सोडाव्या लागतील. एकूणच सध्याच्या वातावरणात भाजपाच्या बाजूनं मदत करत शिवसेना शिंदे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळं आपसूकच शिवसेना शिंदे गटाच्या जागांच्या मागणीवर याचा परिणाम होईल", असंही साठे यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. विधानसभेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? भाजपाच्या दाव्यानं शिवसेना, राष्ट्रवादीचं टेन्शन वाढण्याची शक्यता - Assembly Elections 2024
  2. सुरुवातीलाच कमी जागा मिळाल्यामुळे 16 जागा मिळवण्यात मुख्यमंत्री यशस्वी होतील का? - Shinde Group Seats Allocation
  3. महायुतीतील जागा वाटपावर नेत्यांच्या उघड वक्तव्यामुळं दिल्लीतील नेते नाराज? कोणत्या जागांचा तिढा कायम? - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.