नागपूर: गुरुवारी नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र, पुढील आणखी काही दिवस नागपूरसह विदर्भावर अवकाळीपावसाचं संकट कायम असणार आहे. विदर्भात १२ आणि १३ मे दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभाकडून वर्तवण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण विदर्भावरचं सूर्य जणू कोपल्यासारखे चित्र होतं. विदर्भात सर्वचं जिल्ह्याचे तापमान सरासरी ४३अंश सेल्सिअसकडे वाटचाल करत आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे नागरिकांची तूर्तास तरी जीवघेण्या उकाड्यापासून मुक्तता झाली आहे. पुढील आठ दिवस नागपूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस होईल, असा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
अवकाळीमुळे शेतकऱ्यांची दैना:- गुरुवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखीचं बिकट झाली आहे. कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल विकण्याकरिता आलेल्या शेतकऱ्यांचे धान्य, भाजीपाला आणि फळांचे नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या कृषीमालाला अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. त्यामुळे, सरकारनं तात्काळ सर्वेक्षण करून मदत द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
-
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 kmph) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 9, 2024
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/EGGvZknH4P
- ५० मिलिमीटर पाऊस, तापमानात घट-गेल्या २४ तासांमध्ये नागपूर शहरात, जिल्ह्यात ५० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झालीय. त्यामुळे गेल्या ५८ वर्षांचा रेकॉर्ड देखीलमोडीत निघाला आहे. मे महिन्यात इतका पाऊस ५८ वर्षांपूर्वी झाला होता. तापमानात देखील १५ अंश सेल्सिअस इतके कमी झालेले आहे.
१९ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट- हवामान विभागानं राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, बुलढाणा चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे. अमरावती आणि नागपूरमध्ये आज वीजांच्या गडगडासह मुसळधार अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत आज सकाळच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ आणि दुपारपर्यंत निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४ अंश सेल्सियस आणि २७ अंश सेल्सियसच्या आसपास असेल.
हेही वाचा-