सातारा Koyna Dam: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मंगळवारी रात्रीत तब्बल ३०० मिलीमीटर पाऊस झालाय. जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल दोन टीएमसीने वाढ होऊन पाणीसाठा सत्तरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. सध्या धरणात प्रतिसेकंद ५० हजार क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.
पाणीसाठ्यात दोन टीएमसीने वाढ: कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात एकाच रात्रीत तब्बल २ टीएमसीने वाढ झाली आहे. संततधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढत आहे. सध्या प्रतिसेकंद ५० हजार क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या चोवीस तासात कोयनानगर येथे १६२ तर नवजा आणि महाबळेश्वरमध्ये प्रत्येकी १५७ मिलीमीटर पावसाची नोंद झालीय.
कोयनेचा पाणीसाठा ७० टीएमसीच्या उंबरठ्यावर: पावसाची संततधार आणि पाण्याची आवक वाढत असल्यानं कोयना धरणातील पाणीसाठा ६८ टीएमसीवर पोहोचला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत पाणीसाठा सत्तरी गाठू शकतो. त्यामुळे धरणातून सध्या सुरू असणाऱ्या विसर्गात वाढ होवू शकते. विसर्ग वाढविण्यात आल्यास कोयना आणि कृष्णा नदीला मोठा पूर येईल.
आठवड्याभरातील पावसानं जलचित्र पालटलं आहे. अतिवृष्टी प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दोन दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जाही करण्यात आलाय. झारखंडमधील हवामानाचा महाराष्ट्रावर परिणाम होवू लागल्यामुळे हवामान विभागानं पावसाचा जोर पुढील तीन दिवसात कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भूकंपाचा धक्का: सातारा जिल्ह्यातील चांदोरी धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. अतिवृष्टी आणि भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वारणावतीसह परिसरात पहाटे 4 वाजून 47 मिनिटांवर भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
हेही वाचा
- साताऱ्यासह रत्नागिरीला रेड अलर्ट; कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Heavy Rain In Mumbai And Satara
- कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा 'धुमधडाका'; चोवीस तासात 657 मिलीमीटर पावसाची नोंद - Heavy Rain In Sataraसातारा जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'; कोयना धरणातील पाणीसाठा 'पन्नाशी' पार - Red Alert For Rain In Satara