मुंबई Heavy rain in Mumbai : रविवारी रात्री मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला ज्यामुळं विविध भागात पाणी साचलं आहे. पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. उत्तर मुंबईतील अनेक भागात पहाटे 4:00 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. मुंबईतील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, अंधेरी अशा अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये रात्रीपासूनच पावसानं हजेरी लावलीय.
या जिल्ह्यात रेड अलर्ट, यलो अल्ट आणि ऑरेंज अलर्ट : हवामान खात्यानं सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपी संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, नांदेडसाठी यलो अलर्ट जारी केलाय. हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळं बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्लाही भारतीय हवामान विभागानं दिलाय. सिंधुदुर्ग आणि शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला. बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सुचना : मच्छिमारांना 9 जून ते 13 जून या कालावधीत उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. या कालावधीत उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छिमारांनी या काळात उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला.
मान्सूनची सुरुवात दोन दिवस अगोदर- नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशाच्या काही भागांमध्ये आणि आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे. पुढील 2-3 दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राचा काही भाग (मुंबईसह) आणि तेलंगणामध्ये नैऋत्य मान्सून पुढं जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. या वर्षी मान्सूनची सुरुवात दोन दिवस अगोदर झाली आहे. या वर्षी केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर मान्सूनपूर्व पाऊस झालाय.
हेही वाचा