ETV Bharat / state

मुंबईला पावसानं झोडपलं! राज्यात पुढचे पाच दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज - Maharashtra weather update today

Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून दाखल झाला असून मुंबईतील अनेक भागात सकाळपासून मुसळधार पाऊस झालाय सुरूय. पावसाच्या आगमनामुळं शहरातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय.

Rain Update
Rain Update (Reporter ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 12:27 PM IST

मुंबईत मुसळधार पाऊस (Reporter ETV Bharat)

Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलाय. ठिकठिकाणी पावसानं थैमान घातलंय. मुंबईत पहाटे 4:00 वाजल्यापासून पावसानं हजेरी लावलीय. हवामान विभागानकडुन मुंबईत शहराला यलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय. मुंबईतील अंधेरी परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी अशा अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय. पावसाच्या आगमनामुळं शहरातील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय.

या भागांत पावसाची शक्यता : कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर किनारपट्टीवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानकडून वर्तवण्यात आलीय. नैऋत्य मान्सून शनिवारी मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा आणि दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा आणि किनारी आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये पोहोचलाय. नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालीय.

या जिल्ह्यात रेड अलर्ट, यलो अल्ट आणि ऑरेंज अलर्ट- भारतीय हवामान खात्याने (IMD) सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळे आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजनुसार 40-50 किमी प्रति तास वेगानं वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 तासांत होण्याची शक्यता आहे. हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्लाही भारतीय हवामान विभागानं दिला आहे.

  • या भागात उष्णतेची लाट कायम : उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट आहे. हरियाणा, दिल्ली, दक्षिण उत्तर प्रदेश, आग्नेय राजस्थान, मध्य प्रदेश, नैऋत्य बिहार या राज्यांचं कमाल तापमान 43 ते 46 अंश सेल्सिअस होते. किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण, गोवा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, ओडिशा येथे मुसळधार पाऊस झालाय.

हेही वाचा

  1. देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ शंभूराज देसाई म्हणाले; "मला मंत्रिपदापासून मुक्त करा", कारण काय? - Shambhuraj Desai News
  2. घाटकोपर होर्डिंग प्रकरण: फरार आरोपी जान्हवी मराठेसह आणखी एकास गोव्यातून अटक - Ghatkopar Hoarding Case
  3. धक्कादायक! अल्पवयीन मुलीचं अपहरण करून पाजली बियर अन् केला बलात्कार - Minor Girl Rape Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.