ETV Bharat / state

"भाजपाचा कार्यकर्ता महायुतीविरोधात लढणार..."; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला विधानसभेचा प्लॅन - Chandrashekhar Bawankule

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 8:24 AM IST

Chandrashekhar Bawankule : राज्यात काही महिन्यात विधानसभा निवडणूक येवून ठेपली आहे. अशात सर्व पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्या दारुण पराभवानंतर विधानसभेसाठी भाजपाच्या वाट्याला किती जागा येतील याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

Chandrashekhar Bawankule
माध्यमांशी संवाद साधताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (ETV Bharat Reporter)

नागपूर Chandrashekhar Bawankule : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा जोरदार सुरू झाली. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाच्या वाट्याला किती जागा येतील याकडं सर्वांचं लक्ष लागलं. अशात आता अजित पवार यांनी सिटिंग-गेटिंग हे सूत्र निश्चित झालं असल्याचं सांगितलंय. या संदर्भात बोलताना विचारलं असता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीत सिटिंग-गेटिंग हे सूत्र वापरताना भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला जाईल. जागावाटपासंदर्भात विषय भाजपाचे केंद्रीय नेतृत्त्व आणि राज्यातील महायुतीचे नेते समन्वयानं हा गुंता सोडवतील."

भाजपाचा कार्यकर्ता महायुतीच्या विरोधात लढणार नाही : "प्रत्येकाला आपण निवडणूक लढावी असं वाटतं. हर्षवर्धन पाटील यांना ज्या जागेवरून लढण्याची इच्छा आहे, ती जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसची आहे. हर्षवर्धन पाटील, अजित पवार आणि आम्ही सर्व एकत्र चर्चा करून योग्य निर्णय घेवू. भाजपाचा कोणताही कार्यकर्ता हा महायुतीच्या विरोधात लढणार नाही. ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचे उमेदवार लढताना भाजपात बंडखोरी होणार नाही याची काळजी घेणार आहोत. मोदी सरकार आणि महायुती सरकारनं केलेल्या विकास कामाची आमच्याकडं शिदोरी आहे. जनतेपर्यंत पोहचून विकासाची मोट बांधून महाराष्ट्रात मतं घेऊ," असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी यांना ईडीची भीती का वाटते? : माझ्यावरसुद्धा ईडी कारवाई करणार, असा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "राहुल गांधी यांना कशाची भिती आहे? ते अफवा का पसरवत आहेत? नौटंकी करून सहानुभूती मिळविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. लोकसभेत खोटे बोलले. मात्र, आता त्यांना जनतेची सहानुभूती मिळणार नाही. "

नागपूर जिल्ह्याला ५ हजार कोटींचा अतिरिक्त निधी : २०१४ मध्ये जिल्हा नियोजन समितीला २०० कोटीचा निधी मिळत होता आता त्यात १००० कोटींची वाढ झाली आहे. उपमुख्यमंत्री तसंच नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १२०० कोटींचा निधी दिला. या व्यतिरिक्त ५००० कोटीचा अतिरिक्त निधी दिला. यात जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला २२१ कोटी, नागपूर सुधार प्रन्यासला १५६ कोटी, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला १५७ कोटी, नागपूर शहराच्या विकासाकरिता महानगर पालिकेला २०७० कोटी, महावितरणच्या विविध कामांकरिता ५०० कोटी, शेतकऱ्यांच्या सिंचना करिता ८२० कोटी, अमृत नळ योजनेसाठी २०३ कोटींचा निधी दिला. महाराष्ट्राचा विकास होत असताना उपराजधानी नागपूरच्या विकासाकरिता भरीव मदत केल्याने आणि शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केल्याबद्दल शेतकऱ्यांच्यावतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव जिल्हा नियोजन समितीमध्ये पारित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा

  1. उद्धव ठाकरेंनी दाखवली मानसिक दिवाळखोरी; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका - Chandrasekhar Bawankule
  2. "...त्याचवेळी फडणवीसांवर एफआयआर का नाही केला?" चंद्रशेखर बावनकुळेंचा अनिल देशमुखांना सवाल - Chandrashekhar Bawankule
  3. राज्यात पुन्हा ‘डबल इंजिन’चं सरकार येणार”; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती - Chandrashekhar Bawankule

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.