ETV Bharat / state

राजकीय फुटीनंतर पवार कुटुंबात 'पॉवर वॉर', व्हायरल पत्रावर अखेर राजेंद्र पवार यांनी मांडलं स्पष्ट मत

Maharashtra Politics : सद्यस्थितीची परिस्थिती अजित पवार यांनी भाव-भावकीच्या तालावर आणून ठेवलीय, अशा मथळ्याखाली निनावी पत्र बारामतीत फिरत आहे. बारामतीकरांची भूमिका या नावानं हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर आमदार रोहित पवार यांचे पिता राजेंद्र पवार यांनी मत मांडले आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 8:09 PM IST

Updated : Feb 28, 2024, 8:54 PM IST

राजेंद्र पवार यांची प्रतिक्रिया

बारामती Maharashtra Politics : पवार कुटुंब राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळं राज्याचं राजकारण पवार कुटुंबाभोवतीच फिरत असल्याचं दिसून येत आहे. तसंच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्र लिहून भाजपासोबत जाण्याच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केलं होतं. त्यानंतर कालपासून बारामतीत एक पत्र व्हायरल होत आहे. "बारामतीतील बारामतीकरांची भूमिका" असं या पत्राचं नाव असून पवार कुटुंबीयांच्या फुटीमागंच कारण यातून समोर येत आहे. या पत्रावर राजेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"जेव्हा लोकांना दबावातून व्यक्त होता येत नाही. तेव्हा लोक पत्रातून व्यक्त होतात, असा दावा राजेंद्र पवारांनी केलाय. तसंच मी राजकारणात प्रवेश केला असता, तर आजची परिस्थिती निर्माण झाली असती", असंदेखील राजेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.

काय लिहिलंय पत्रात? : पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं. दिवंगत शारदाबाई पवार त्यावेळच्या लोकल बोर्डाच्या मेंबर म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर आप्पासाहेब पवार (रोहित पवारांचे आजोबा) यांनी आपले बंधू शरद पवार यांच्यासोबत शेकापचं काम करत होते. मात्र, शरदरावांचा ओढा काँग्रेसकडं होता. याच पक्षात ते पुढे जात राहिले. त्यामुळं आप्पासाहेबांनी आपला मोर्चा शेतीकडं वळवला. पुढची पिढी जेव्हा, तयार होत होती तेव्हा दिवंगत अनंतराव यांचा मुलगा अजित पवार, आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र पवार या दोघांपैकी कुणाला राजकारणात पाठवायचं याबाबत विचार होत होता. तेव्हा दोन्ही भावांनी अनंतराव पवार यांच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं म्हणत अजित पवारांना पुढं केलं. मात्र त्यावेळी राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील त्यांना राजकारणात संधी देण्यात आली नाही. तेव्हा अजित पवारांना दोघांनीही वेळोवेळी सांभाळून घेतलं. तेंव्हा राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही. पुढचा इतिहास तुम्हाला माहितच आहे. पण तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ पवार किंवा रोहित पवार अशी निवड करायची ठरली, तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहित पवारांची निवड करुन अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला. पुढं सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशीवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या म्हणूनच सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे. "वाजवा तुतारी गाडा गद्दारी, असं आशयाचं लिखाण या पत्रात लिहिण्यात आलं आहे.

याबाबत काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्नावर बोलण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर पत्रकारांवर रागावले. त्यांनी पत्राबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.

हे वाचलंत का :

  1. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती, त्याप्रमाणं... - एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
  2. तुम्ही अंगावर आला तर आम्ही शिंगावर घेऊ, जितंद्र आव्हाड यांचा अजित पवार गटाला इशारा
  3. 'निवडणुकीत उभं राहिल्या शिवाय पर्याय नाही'; प्रकाश आंबेडकरांचा जरांगे पाटलांना प्रेमाचा सल्ला

Last Updated : Feb 28, 2024, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.