ED मुंबईने 12 जून रोजी मुंबई आणि पुण्यातील 19 ठिकाणी 'फेअरप्ले' प्रकरणी शोध मोहीम राबवली होती. क्रिकेट/आयपीएल सामने आणि लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालांचे बेकायदेशीर प्रसारण केल्याचा आरोप 'फेअरप्ले' वर होता. ईडीनं टाकलेल्या छाप्यात दस्तऐवज, डिजिटल उपकरणे, रोख रक्कम, बँक निधी, डीमॅट खाते आणि लक्झरी घड्याळे जप्त केली आहेत.
मुंबई, पुण्यात ईडीचे छापे; आयपीएल सामने आणि लोकसभा निकालांचे बेकायदेशीर प्रसारण केल्याचा होता आरोप - Maharashtra live updates news
Published : Jun 13, 2024, 7:11 AM IST
|Updated : Jun 13, 2024, 7:24 PM IST
Maharashtra Breaking News : 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजसाठी या पेजवर अपडेट पाहत राहा. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या https://www.etvbharat.com/mr/maharashtra
LIVE FEED
मुंबई, पुण्यात ईडीचे छापे
होर्डिंग दुर्घटनेसारख्या घटना भविष्यात होवू नये यासाठी ठोस उपाययोजना करणार
मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून मदत देण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून अधिक मदत मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेसारख्या भविष्यात दुर्घटना होवू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. आपदग्रस्तांना अधिकची मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
'शादी के डायरेक्टर करण और जोहर' चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती
मुंबई : 'शादी के डायरेक्टर करण और जोहर' या शुक्रवारी प्रदर्शित होणार असलेल्या चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयाने 10 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक करण जोहर यांनी या चित्रपटामध्ये त्यांचे नाव विना परवानगी वापरण्याला आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती रिजाय छागला यांच्यासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्या. छागला यांनी हा निर्णय दिला. करण जोहरतर्फे ज्येष्ठ वकील अॅड झाल अंध्यारुजीना यांनी युक्तीवाद केला.
पब-जी गेम खेळण्याच्या नादात मुलाचा तलावात पडून मृत्यू
नागपूर : वाढदिवसाच्या दिवशी पब-जी गेम खेळण्याचा नाद एका १६ वर्षीय मुलाच्या जिवावर बेतला. पब-जी गेम खेळताना भान हरपलेला हा मुलगा थेट अंबाझरी तलावाच्या अगदी शेजारी असलेल्या पंपिंग स्टेशनजवळ एका खड्ड्यात पडला. यात त्याचा मृत्यू झाला. पुलकित शहादादपुरी (१६) असे मृत मुलाचे नाव आहे.
मनोज जरांगेचं उपोषण स्थगित
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज सहाव्या दिवशी उपोषण मागे घेतलं. तसेच सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला १ महिन्याची मुदत दिली. एका महिन्यात सरकारने मागण्या मान्य न केल्यास आम्ही विधानसभेच्या रिंगणात उतरू, असा इशारा देखील त्यांनी राज्य सरकारला दिला.
नागपुरातील चामुंडा बारुड कंपनीत स्फोट
नागपूर-अमरावती मार्गावर असलेल्या धामणा येथे आज बारुद कंपनीत मोठा ब्लास्ट झाला आहे. स्फोटात सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे तर ५ कामगार जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
सुनेत्रा पवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला
सुनेत्रा पवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुनिल तटकरेंची उपस्थिती होती.
नाशिक शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं कारखान्यावर धाडसत्र- अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा आरोप
नाशिक शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून साखर कारखान्यावर धाडसत्र सुरू झाल्याचा आरोप भाजपाचे युवानेते तसेच नाशिक शिक्षक मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलाय. कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच भाजपचे विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदार संघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर सध्या याजागेवर विद्यमान आमदार किशोर दराडे हे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी करत आहेत. त्यातच विवेक कोल्हे यांनी देखिल अपक्ष उमेदवारी दाखल करुन त्यांना शह देण्याचा प्रयत्न केलाय.
सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज
सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी राष्ट्रवादीचे उपस्थित होते.
एसटी महामंडळातील सर्व विनंती बदल्यांमध्ये येणार पारदर्शकता
मुंबई-एसटी महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी या नव्या पध्दतीने शक्य होणार असल्याचं एसटी महामंडळानं म्हटलं आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे विनंती बदली अर्ज वर्षानुवर्ष धुळखात पडलेले असतात. याला आळा घालण्यासाठी आणि सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय मिळण्याच्या हेतूने महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्या विशेष पुढाकाराने बदल्या संदर्भातील अॅप एसटीमहामंडळाकडून विकसित करण्यात आलं आहे.
सुनेत्रा पवार या भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार, नाराज नसल्याचं छगन भुजबळांनी केलं स्पष्ट
राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार विधानभवनात दाखल झाल्या आहेत. त्यांच्या नावाबाबत कोणतीही नाराजी नसल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीत कमालीची नाराजी दिसत होती. सुनेत्रा पवार या भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार असल्यानं राज्यात पुन्हा एकदा महायुती बळकट असल्याचं दिसून आलं आह.
मनसेचा आज राज्यव्यापी मेळावा, राज ठाकरे घेणार विधानसभा मतदारसंघांचा आढावा
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे तयारीला लागली आहे. आज वांद्रे येथील हॉटेल रंगशारदा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यव्यापी पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्ष, शहर प्रमुख यांसह अन्य पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या मेळाव्यात राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहे. सर्व विधानसभा मतदारसंघांचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. या विधानसभा निवडणुकीत मनसे 20 जागांवर दावा करेल, अशी चर्चा आहे. या वीस जागा कोणत्या असतील याचा आढावादेखील या बैठकीत घेतला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना दिलेले ग्रेस मार्क्स चुकीचे असल्याचे एनटीएनं सर्वोच्च न्यायालयात मान्य केलं-अलख पांडे
NEET-UG 2024 च्या परीक्षेवर सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर, याचिकाकर्ता आणि फिजीक्सवालाचे सीईओ अलख पांडे म्हणतात, "आज NTA ने सर्वोच्च न्यायालयासमोर मान्य केले की विद्यार्थ्यांना दिलेले ग्रेस गुण चुकीचे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचेही एनटीएनं मान्य केलं. ज्या 1,563 विद्यार्थ्यांनी ग्रेस मार्क्स मिळवले आहेत, त्यांची पुनर्परीक्षा 23 जून रोजी केली होणार आहे. विद्यार्थ्यांना दिलेले ग्रेस मार्क्स चुकीचे असल्याचे एनटीएनं सर्वोच्च न्यायालयात मान्य केलं आहे. नीटच्या परीक्षेचे पेपर लीक झाल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरुच राहणार आहे."
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर कामगारांचे आंदोलन सुरू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांचे आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर आम्ही आत्मदहन करू असा कामगारांनी इशारा दिला. गेल्या दोन वर्ष सुपरमॅक्स कंपनीचा प्रलंबित विषय मार्गी न लागल्याने कामगार आक्रमक झाले आहेत.
ग्रेस गुण दिलेल्या 1,563 विद्यार्थ्यांचे स्कोअरकार्ड रद्द करण्याचा निर्णय- एनटीएची सर्वोच्च न्यायालयात माहिती
एनटीए सर्वोच्च न्यायालयाला NEET-UG निकालाबाबत स्पष्टीकरण दिलं. एनटीएन सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की, वेळेच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी 1,563 पेक्षा जास्त उमेदवारांच्या निकालांचे पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने ग्रेस गुण दिलेल्या 1,563 विद्यार्थ्यांचे स्कोअरकार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा चाचणी घेण्याचा पर्याय दिला जाईल, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली. ही परीक्षा 23 जून रोजी परीक्षा घेण्यात येतील. 30 जूनपूर्वी निकाल जाहीर केले जातील.
आईस्क्रीमच्या कोनामध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला, पोलिसांचा तपास सुरू
मुंबईतील मालाड परिसरात एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनामध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला आहे. त्यानंतर महिलेने मालाड पोलीस ठाणे गाठले. मालाड पोलिसांनी आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून हे आईस्क्रीम तपासासाठी पाठवले आहे. आईस्क्रीममध्ये सापडलेले मानवी अवयव पोलिसांनी फॉरेन्सिककडे पाठवल्याची माहिती मालाड पोलिसांनी दिली.
अहंकाराची सर्व मर्यादा पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी ओलांडली-संजय राऊत
अहंकाराची सर्व मर्यादा पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी ओलांडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपाला वाढविलं. गडकरी, राजनाथ सिंह गप्प बसले आहेत? ते मोदी शाह यांच्याविरोधात बंड करणार? भाजपाच्या मतावर सुनेत्रा पवार जातील का? संघ विरोध करणार का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
कळवा येथे फ्लॅटचे छत कोसळल्यानं कुटुंबातील तिघे जखमी, धोकादायक इमारतीमधून 100 जणांना बाहेर काढले
ठाणे-ठाणे शहरातील कळवा येथे त्यांच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचे छत कोसळल्याने एक वृद्ध दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. ही इमारत धोकादायक असल्यानं स्थानिक अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि आरडीएमसीच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यांनी इमारतीच्या 30 फ्लॅटमध्ये राहणाऱ्या सुमारे 100 रहिवाशांना बाहेर काढले.
जगन्नात मंदिर व्यवस्थापनाला ५०० कोटींचा निधी देणार- ओडीशाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री
ओडिशामध्ये प्रथमच भाजपाच्या नेत्यानं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी आज सकाळी जगन्नाथ मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "आम्ही कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आज सकाळी 6.30 वाजता मी आणि पुरीचे खासदारसंबित पात्रा) 'मंगला आरती'ला उपस्थित राहिलो. आम्ही जगन्नाथ मंदिराच्या विकासासाठी आणि इतर कामांसाठी मंत्रिमंडळात निधीचा प्रस्ताव ठेवला आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात जगन्नात मंदिर व्यवस्थापनाला 500 कोटी रुपयांचा देणार आहोत."
मुंबई उत्तर मध्य लोकसभेत व्होट जिहादमुळे काँग्रेसचा विजय-किरीट सोमैय्या यांचा आरोप
मुंबई उत्तर मध्य लोकसभेत उज्जवल निकम यांचा झालेला पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला. मुंबई उत्तर मध्य लोकसभेतील पराभव हा व्होट जिहादमुळे झाल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैय्या यांनी केला. त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत मतदानाची आकडेवारी जाहीर केली. काँग्रेसचा विजय म्हणजे व्होट जिहादचा विजय असल्याचंही त्यांनी म्हटलं.
दूध उत्पादकांना अनुदान मिळाले नाही तर रस्त्यावर उतरू, शरद पवारांचा सरकारला इशारा
पुणे- राज्य सरकारनं दूध उत्पादकांना अनुदान न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दिला. ते इंदापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या भेटीदरम्यान ते बोलत होते. जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्यातील सरकार बदलण्याची गरज असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले. सध्याच्या सरकारला या समस्या समजल्या आहेत की नाही, याची मला खात्री नाही. येत्या चार ते सहा महिन्यांत तुम्ही आमच्याकडे धोरणात्मक सत्ता सोपवावी, असेही राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी सांगितले.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह कुवेतच्या दौऱ्यावर, तेथील परिस्थितीची सरकारला देणार माहिती
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह हे आज कुवेतच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दौऱ्याला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना कीर्तीवर्धन म्हणाले, " कुवेतमधील घटना दुर्दैवी असून पंतप्रधानांसह आम्ही सर्वजण खूप चिंतेत आहोत. मी तिथे जाऊन परिस्थिती पाहणार आहे. दूतावासातील लोक जखमींची काळजी घेत आहेत. तेथील परिस्थितीची माहिती सरकारला देणार आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जात आहे ."
भारत-अमेरिकेचा क्रिकेट सामना पाहून पाकिस्तानचा क्रिकेप्रेमी खूश, म्हणाला...
पाकिस्तानच्या एका क्रिकेटप्रेमीनं भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी 3000 डॉलरला ट्रॅक्टर विकला. हा सामना पाकिस्ताननं हरल्यानंतर क्रिकेटप्रेमी खूप निराश झाला. मात्र, अमेरिका-भारताचा सामना पाहून खूश झाला. "सूर्याच्या कामगिरीनं माझ मनं जिंकलयं. ट्रॅक्टर विकल्याचे पैसे वसूल झाले," अशी त्यानं प्रतिक्रिया दिली.
-
#WATCH | New York, USA: "I sold my tractor for $3000 to watch the India vs Pakistan match, in which we lost. I was very disappointed... Surya has won my heart today. Tractor ke paise India ne vasool karva diye," says a Pakistani fan on India's win against US in the T20 World Cup. pic.twitter.com/9wJdoOjpRS
— ANI (@ANI) June 13, 2024
दुमजली घराला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू
गाझियाबाद/नवी दिल्ली: गाझियाबादमधील दुमजली घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. बुधवारी उशिरा रात्री बहता हाजीपूर येथील एका घराला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.