ETV Bharat / state

पटोले म्हणतात, "रश्मी शुक्ला भाजपासाठी काम करतात"; आता शेलार म्हणाले, "नोटीस पाठवणार..."

नाना पटोलेंनी रश्मी शुक्ला भाजपासाठी काम करत असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आक्षेप घेत आशिष शेलार त्यांना 7 दिवसांत पुरावे सादर करण्याची नोटीस पाठवणार आहेत.

Nana Patole and Ashish Shelar
नाना पटोले आणि आशिष शेलार (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2024, 1:27 PM IST

Updated : Nov 4, 2024, 6:58 PM IST

मुंबई : फोन टॅपिंगप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली करण्यात आलीय. त्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगू लागलेत. नाना पटोलेंनी रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलार त्यांना 7 दिवसांत पुरावे सादर करण्याची नोटीस पाठवणार आहेत. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते.

पटोलेंची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार : काँग्रेसनं भाजपावर बेछुट आरोप करण्याआधी त्याचे पुरावे द्यावे लागतील. किंबहुना आज ते आरोप त्यांनी केले असतील आणि त्यांच्याकडे पुरावे नसतील, तर आज मी घोषित करतोय की नाना पटोलेंची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार आहे. खरं तर हा भाजपाच्या बदनामीचा प्रयत्न आहे. रश्मी शुक्ला त्यांची बाजू मांडतील, पण देवेंद्र फडणवीसांचं नाव यांनी विनाआरोप घेतलं असेल तर त्यांनी फोन टॅपिंगचे पुरावे द्यावेत अन्यथा त्यांना 7 दिवसांत नोटीस पाठवणार आहोत. नाना पटोलेंनी विनापुरावे बेछूट आरोप केल्याबद्दल त्यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी ही मागणी आम्ही करू, असंही आशिष शेलार म्हणालेत. शुक्ला यांनी विरोधकांचे फोन टॅप केल्याचे पुरावे नाना पटोले यांनी सात दिवसात सादर करावेत, अशी नोटीस नाना पटोले यांना पाठवणार असल्याचं शेलार म्हणालेत. नाहीतर नाना पटोले यांच्यावर बेछूट, बिनबुडाचे, विना पुरावे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचंही शेलार यांनी सांगितलंय.

निवडणूक आयोग निःपक्षपातीपणे काम करते- शेलार : पुढे ते म्हणाले की, काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली केली असेल तर निवडणूक आयोग हे निःपक्षपातीपणे काम करीत आहे हे काँग्रेसवाले मानायला तयार झालेत. परंतु उद्या त्याच निवडणूक आयोगाचा एखादा निर्णय यांच्या विरोधात गेला तर त्यांनी त्याबाबत आगडोंब करू नये. नाहीतर पुन्हा निवडणूक आयोग एकतर्फी निर्णय घेतो. निःपक्षपातीपणे काम करत नाहीत, अशी दुहेरी टुमटुमी हे काँग्रेसवाले वाजवतील, असा टोलाही आशिष शेलारांनी दिलाय.

नाना पटोले काय बोलले? : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, याकरिता मी निवडणूक आयोगाला मनापासून धन्यवाद देतो. रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करीत होत्या. त्यांना शिंदे - फडणवीस सरकारने दोन वर्षाची अवैध मुदतवाढ दिली होती. या बदली करता इतके दिवस का लागले? हा प्रश्न अजूनही आमच्या मनात आहे. त्या या पदावर बसल्या म्हणून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली होती. त्यांना या पदावरून हटवलं असलं तरी निवडणुकीशी संबंधित कुठल्याही व्यवस्थेत ते काम करता कामा नयेत, याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी, अशी विनंतीही नाना पटोले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केलीय. विरोधकांचे फोन टॅपिंग प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालक पदी केलेली नियुक्ती व त्यांना देण्यात आलेली बढती यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. तसेच काँग्रेस नेत्यांकडून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली होती. रश्मी शुक्ला या उघडपणे भाजपासाठीच काम करत होत्या. त्यांनी विरोधकांचे फोन टॅप केले. राज्य सरकारने त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावर बसवले असून त्या या पदावर आल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला होता.

तीन आयपीएस अधिकाऱ्यांचं पॅनल तयार : खरं तर विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करून सरकारला फार मोठा धक्का दिलाय. याकरिता तीन आयपीएस अधिकाऱ्यांचं पॅनल तयार करण्यात आलंय. त्यांच्याकडून अहवाल मुख्य सचिवांना देण्यात येणार आहे. त्यानंतर तो अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. रश्मी शुक्ला यांना अद्याप दुसऱ्या ठिकाणची पोस्टिंग देण्यात आलेली नाही. परंतु त्यांचा अतिरिक्त राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्याच्या सूचनाही निवडणूक आयोगानं राज्यातील मुख्य सचिवांना दिल्यात.

हेही वाचा :

  1. आमचे फोन आजही टॅपिंग केले जातात, संजय राऊतांचा गंभीर आरोप
  2. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पक्षपाती, तत्काळ हटवण्याची नाना पटोले यांची निवडणूक आयोगाकडे तिसऱ्यांदा मागणी

Last Updated : Nov 4, 2024, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.