ETV Bharat / state

मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या दुपारी ४ वाजता, नागपुरात नव्या मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज - MAHARASHTRA CABINET EXPANSION

मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज झाले आहेत. उद्या दुपारी ४ वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

MAHARASHTRA CABINET EXPANSION
नव्या मंत्र्यांसाठी बंगले सज्ज (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2024, 10:20 PM IST

नागपूर : सोमवारपासून (16 डिसेंबर) नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे. महायुती सरकारचं यावेळचं हे पहिलंचं मोठं अधिवेशन आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आमदार आणि मंत्र्यांच्या निवासाची सोय रवी भवन, आमदार निवास आणि नाग भवनात करण्यात आलीय. सुरक्षेच्या दृष्टीनं परिसराला छावणीचं स्वरुप दिलं जात असून जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या मंत्र्यांसाठी रवी भवनातील 40 बंगले सज्ज झाले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे बंगले आधीचं सज्ज झाले आहेत.

नव्या मंत्र्यांना मिळणार बंगले : उद्या नवीन मंत्र्यांचा शपथविधी आटोपल्यानंतर लगेच बंगल्याचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती समोर आलीय. उद्या भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे एकूण 40 पेक्षा अधिक मंत्री शपथ घेणार आहेत. शपथविधीनंतर मंत्री नवीन बंगल्यात शिफ्ट होणार आहेत.

नव्या मंत्र्यांसाठी बंगले सज्ज (Source - ETV Bharat Reporter)

महिला आमदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था : सत्ताधारी महायुतीमधील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह विरोधीपक्षातील सर्व आमदारांची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आलेली आहे. महिला आमदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमदार निवासातील एक फ्लोर राखीव ठेवण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच नागपूर येथील रामगिरी या शासकीय बंगल्याबाहेर 'देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस' नावाची पाटी लावण्यात आली. तर देवगिरी बंगल्याबाहेर उपमुख्यमंत्री 'एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे' नावाची पाटी लागली आहे.

अजित पवारांच्या बंगल्याबाहेरील पाटी जैसे थे : महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना विजयगड हा शासकीय बंगला देण्यात आला होता. यावेळेस सुद्धा ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या बांगल्यात बदल झाला नाही, त्यामुळं त्यांच्या बंगल्याबाहेर लावण्यात आलेली पाटी जैसे थे ठेवण्यात आली आहे.

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका कार्यक्रम पत्रिकेवरुन उद्या संध्याकाळी चार वाजता नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल हे आता स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा

  1. दत्त जयंतीनिमित्त सारंगखेड्यात चेतक फेस्टिवलला सुरुवात; विविध राज्यातील अश्वप्रेमीचा सहभाग
  2. बुलढाणात गर्भलिंग निदान करताना डॉक्टरांना रंगेहात पकडलं; आरोग्य विभागाच्या विशेष पथकाची कारवाई
  3. सॅटर्डे ठरला लॉबिंग डे; मंत्री पदासाठी इच्छुक आमदारांच्या भेटीगाठी वाढल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.