ETV Bharat / state

जालन्यात विजय वडेट्टीवार यांच्या समोर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा - Maharashtra news live updates

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 7:59 AM IST

Updated : Jun 20, 2024, 7:17 PM IST

Maharashtra breaking news
Maharashtra breaking news (Source- ETV Bharat)

Maharashtra Breaking News : 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजसाठी या पेजवर अपडेट पाहत राहा. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या /mr/maharashtra

LIVE FEED

7:16 PM, 20 Jun 2024 (IST)

विजय वडेट्टीवार यांच्या समोर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा

वडेट्टीवार यांच्या समोरच काँग्रेस जिल्हाध्यक्षाला शिवीगाळ

काँग्रेसचे पदाधिकारी सत्संग मुंडे यांचं निलंबन केल्यामुळे शिवीगाळ

काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना ओबीसी तरुणांची शिवीगाळ केल्याचा आरोप

वाडीगोद्री येथील आंदोलन ठिकाणी ओबीसी तरुणांनी केली शिवीगाळ

काँग्रेस जिल्हाअध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना शिवीगाळ...

कार्यकर्ते आक्रमक होताच वडेट्टीवार आणि देशमुख यांनी घेतला काढता पाय....

5:20 PM, 20 Jun 2024 (IST)

अनिल परब यांची पत्रकार परिषद

अनिल परब यांची पत्रकार परिषद

आमदार अपात्र निर्णयानंतर विधान परिषदेच्या निवडणुका घ्या

पदवीधर मतदान नोंदणीवर ठाकरे गटाचा आक्षेप

ठाकरे गटाने नोंदवलेली नावे रद्द करण्यात आली

1:36 PM, 20 Jun 2024 (IST)

रामोजी राव यांना देशभरातील कर्मचाऱ्यांकडून श्रद्धांजली

रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही नेटवर्कचे संस्थापक रामोजी राव यांना देशभरातील कर्मचाऱ्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी स्वर्गीय रामोजी राव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्वतःच्या हातांनी 'हलवा' तयार केला. रामोजी राव यांच्या निधनानं माध्यम, टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

12:14 PM, 20 Jun 2024 (IST)

आरक्षणाबाबत केंद्र सरकारनं बघ्याची भूमिका घेऊ नये-शरद पवार

राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर मत व्यक्त केलं. शरद पवार म्हणाले, "केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. मराठा समाज आणि इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) कोट्याच्या मागणीशी संबंधित प्रकरणे सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा," असे मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष वाढत चालला. त्याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष पवार म्हणाले की, "आरक्षणाबाबत केंद्राने पुढाकार घ्यावा, हाच पर्याय आहे. त्यासाठी कायद्यात आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. शरद पवार हे बारामती येथे माध्यमांशी बोलत होते.

11:48 AM, 20 Jun 2024 (IST)

नितीश कुमार सरकारला धक्का, बिहारमधील ६५ टक्के आरक्षण रद्द करण्याचा पाटणा उच्च न्यायालयाचा निकाल

बिहार सरकारच्या शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये एससी, एसटी, ईबीसी आणि इतर मागासवर्गीयांना ६५ टक्के आरक्षण रद्द करणारा निकाल पाटणा उच्च न्यायालयानं दिला. याचिकांवर सुनावणी पूर्ण केल्यानंतर उच्च न्यायालयानं 11 मार्च 2024 रोजी निर्णय राखून ठेवला होता.

10:54 AM, 20 Jun 2024 (IST)

युजीसी नेट परीक्षा रद्द म्हणजे सरकारच्या अकार्यक्षमतेचा आणखी एक नमुना-जयंत पाटील

मुंबई :- युजीसी नेट परीक्षाच रद्द झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एनडीए सरकावर जोरदार निशाणा साधला. देशाच्या भविष्याला जे योग्य न्याय देऊ शकत नाहीत, ते देशाचे भविष्य काय घडवणार? असा सवाल जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवर म्हटले की, "युजीसी नेट परीक्षाच आयोजनात अनियमितता असल्याचे गुप्तचर विभागानं अहवालात नमूद केलं आहे. नीट परीक्षेत झालेला भोंगळ कारभार ताजा असताना हा प्रकार म्हणजे सरकारच्या अकार्यक्षमतेचा आणखी एक नमुना आहे. अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करून विद्यार्थी परीक्षा देत असतात. मात्र, पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे शिक्षण विभागाची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे."

9:58 AM, 20 Jun 2024 (IST)

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येचं केंद्र, देवेंद्र फडणवीस मतांच्या आकडेवारीत मश्गुल-संजय राऊत

राज्यात शेतकरी आत्महत्येचे स्ट्राईक रेट वाढले आहे. गेल्या अडीच वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत उपाययोजना नाहीत. विदर्भातील नेत्यांनी अमरावतीत जावं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतांच्या आकडेवारीत मश्गुल आहेत. महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येचं केंद्र झाल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

8:50 AM, 20 Jun 2024 (IST)

डोक्याला गुंडाळलेले कंबरेचं काढून 'शर्त'... 'बिनशर्ट'च्या टीकेवर मनसेचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला टोला

लोकसभा निवडणुकीत मनसेनं पाठिंबा दिल्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाला खिल्ली उडविली. केवळ मला विरोध करण्यासाठी काहीजणांचा बिनशर्ट पाठिंबा अशी टीका उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरेंवर केली. त्यावर मनसेचे नेते यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " डोक्याला गुंडाळलेले कंबरेचं काढून 'शर्त' आणि 'शर्ट' असले फुटकळ शब्दच्छल करतात. ‘दादू’ काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होतात. तेव्हा काय काढलं होतं ? लबाड लांडगा ढोंग करतय." उद्धव ठाकरेंनी यापूर्वी मोदी सरकारला पाठिंबा दिला होता, याची मनसेनं आठवण करून दिली.

8:34 AM, 20 Jun 2024 (IST)

सासूच्या हत्येनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला अटक

पालघर- पालघर जिल्ह्यात बुधवारी एका व्यक्तीनं सासूची हत्या केली. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीनं खुन केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या मुलांनी घराबाहेर कुलूप लावल्यानं आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला. आरोपीच्या दारू पिण्याच्या सवयीला कंटाळून त्याची पत्नी माहेरी राहत होती.

7:59 AM, 20 Jun 2024 (IST)

UGC-NET परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द, केंद्रीय गृहमंत्री आणि शिक्षणमंत्री कोठे आहेत- शिवसेना ठाकरे पक्ष

UGC-NET रद्द केल्यानं शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी एनडीए सरकारवर टीका केली. "NEET-UG परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे 24 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरी आहे. एनटीए एवढी निष्काळजी आहे का? आता सरकारनं पेपर फुटीमुळे परीक्षा रद्द करूनही कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. केंद्रीय गृहमंत्री आणि शिक्षणमंत्री कोठे आहेत?

7:55 AM, 20 Jun 2024 (IST)

मुंबई शहरासह पूर्व उपनगराला होणार कमी दाबानं पाणीपुरवठा, कारण काय?

मुंबई - मुंबई शहरासह पूर्व उपनगरातील नागरिकांना पुढील काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आधीच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलसाठ्यांमध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने दहा टक्के पाणी कपात सुरू आहे. त्यातच पिसे येथील पंपिंग केंद्रात मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड दुरुस्त करेपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागात पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून आणि काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

Last Updated : Jun 20, 2024, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.