ETV Bharat / state

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी स्वतंत्र लढणार?

विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशातच आता महाविकास आघाडी विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत.

mahavikas aghadi local elections
महाविकास आघाडी नेते (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2024, 4:54 PM IST

Updated : Nov 28, 2024, 5:55 PM IST

मुंबई - 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आलेत. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विधानसभेच्या एकूण 288 पैकी तब्बल 132 जागा जिंकत एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल केलीय. तर, महायुतीला तब्बल 230 जागांवर विजय मिळालाय. विधानसभा निवडणुकीनंतर आता सगळ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशातच आता महाविकास आघाडी विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत.

अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत: राज्यातील महापालिका, पालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ साधारण 2021 मध्ये संपला. त्यानंतर आता तीन वर्षे उलटली तरी अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या चर्चा सुरू असतानाच तिकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागील 3 वर्षांपासून प्रशासक कारभार पाहत आहेत. अशातच या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ 46 जागा आल्याने आघाडीला घटक पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केल्याचं बोललं जातंय.

शिवसेना - उबाठा नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया (Source : ETV Bharat Reporter)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात: महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांच्या हवाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या जाव्यात, असं मत व्यक्त केलंय. "शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी झालेला नाही. हा एका विचाराने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे या पुढील काळात पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या काही उमेदवारांचंदेखील हेच मत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी पक्षातील एका मोठ्या वर्गाची भावना आहे," अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिलीय. यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातदेखील स्वबळाच्या चर्चांना सुरुवात झाल्याचं म्हटलं जातंय.

आमच्या मनात ईव्हीएमबाबत शंका: अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते आणि 14 व्या विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, 'शिवसेनेच्या नेत्यांप्रमाणेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनादेखील स्वबळावर निवडणूक लढवायची आहे. मात्र, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. हा पक्षाचा निर्णय असू शकत नाही. आम्ही निकाल आणि पराभवाची कारणे शोधण्यात व्यस्त आहोत. जोरदार मोदी लाट असूनही आम्ही सध्याच्या निकालांपेक्षा चांगली कामगिरी केलीय आणि त्यामुळेच आमच्या मनात ईव्हीएमबाबत शंका आहेत. न्यायव्यवस्थेने याकडे लक्ष द्यावे," अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.

2025 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार : या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांची आणि प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. दरम्यान, आपण संपूर्ण राज्याचा विचार केल्यास राज्यातील 29 महापालिकांच्या अद्याप निवडणुका झालेल्या नाहीत. तर, 257 नगरपालिका, 289 पंचायत समित्यांच्या निवडणुकादेखील बाकी आहेत. इथे सध्या प्रशासक कामकाज पाहत आहेत. आता 2025 मध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे या निवडणुका मिनी विधानसभेप्रमाणे होतील, असे म्हटले जाते. अशातच विधानसभेत दारुण पराभव झालेले महाविकास आघाडीतील घटक पक्ष या मिनी विधानसभा म्हटल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. सुधांशू त्रिवेदी खरी माहिती असल्याशिवाय आरोप करत नाहीत, विनोद तावडेंचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
  2. "भाजपाचा खेळ खल्लास, भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला", विरोधकांनी विनोद तावडेंना घेरलं, अटकेची केली मागणी

Last Updated : Nov 28, 2024, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.