ETV Bharat / state

शायना एनसी गल्लीबोळात न फिरल्यानं मतदारसंघातील विकासकामांची त्यांना माहिती नाही; अमिन पटेलांचा टोला - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

मुंबादेवी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विजयी होऊन विजयाचा चौकार मारणार असल्याचा विश्वास या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अमिन पटेल यांनी व्यक्त केलाय.

MLA Amin Patel
आमदार अमिन पटेल (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2024, 4:08 PM IST

मुंबई- मुंबादेवी मतदारसंघातून विजयाचा चौकार मारण्याचा आत्मविश्वास विद्यमान आमदार अमिन पटेल यांनी व्यक्त केलाय. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील मुंबादेवी हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शायना एनसी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, गेल्या तीन निवडणुकांपेक्षा ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत सोपी असल्याचा दावा अमिन पटेल यांनी केलाय. या मतदारसंघात पायाभूत सुविधा पुरवल्या गेल्या नसून हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिल्याचा आरोप शायना एनसी सातत्याने करीत आहेत. त्यावर पटेल यांनी शायना यांनी या मतदारसंघातील गल्लीबोळात फेरफटका मारलेला नसल्याने त्यांना मतदारसंघात झालेल्या विकासकामांची माहिती नसल्याचा टोला लगावलाय.

विकासकामांचा डोंगर : मुंबादेवी मतदारसंघात गेल्या 15 वर्षांत आपण विकासकामांचा डोंगर उभा केला असून, त्यामुळे या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार आपल्यावर पूर्णतः समाधानी आहे. तसेच जनतेनं या विकासकामांवर आनंद व्यक्त केल्याचा दावा पटेल यांनी केलाय. 200 कोटी रुपये खर्च करून मतदारसंघात दोन रुग्णालये उभारण्यात येणार असून, त्यासाठी धोरणात्मक मंजुरी सरकारकडून मिळवण्यात आलीय. कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्प 33 एकर जमिनीवर करण्यात येणार असून, त्यासाठी टेंडर डॉक्युमेंटदेखील तयार करण्यात आलेत. निवडणुकीनंतर त्याच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला जाईल, अशी माहिती पटेल यांनी दिलीय.

मिन पटेलांसोबत संवाद (ETV Bharat Reporter)

मतदारांचे ध्रुव्रीकरण अत्यंत चुकीचे : राज्यात भाजपाच्या नेत्यांकडून जातीच्या आणि धर्माच्या नावावर केले जाणारे मतदारांचे ध्रुव्रीकरण अत्यंत चुकीचे असून, त्याबाबत पटेल यांनी खंत व्यक्त केलीय. आपल्या पूर्वजांनी देशाला इंग्रजांच्या विळख्यातून सोडवण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान दिलंय, अनेकांनी त्यामध्ये आपल्या प्राणाचे बलिदान दिले, मात्र आता स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर विशिष्ट समाजाला लक्ष्य करून मतांचे ध्रुव्रीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणे अत्यंत चुकीचे असल्याचं मत पटेल यांनी व्यक्त केलंय. शायना एनसी या मतदारसंघात पाहुण्या उमेदवार असून, निवडणूक काळात त्या प्रचारासाठी फिरतील, देवदर्शन करतील आणि मतदानानंतर पुन्हा निघून जातील, त्यामुळे आपल्याला त्यांच्या उमेदवारीमुळे आव्हान वाटत नसल्याचा दावा पटेल यांनी केलाय. आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपण निश्चित विजयी होऊ, असा विश्वास अमिन पटेल यांनी यावेळी व्यक्त केलाय.

हेही वाचा -

  1. 'लाडकी बहीण योजना' आणली, पण 850 पेक्षा अधिक मुली गायब झाल्यात त्याचं काय", शरद पवार यांचा टोला
  2. शरद पवारांनी भर पावसात घेतली सभा; म्हणाले, "माझा अन् पावसाचा..."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.