ETV Bharat / state

राज्यातील अनेक पराभूत उमेदवारांची व्हीव्हीपॅट मोजणीची मागणी, काही उमेदवारांनी भरले शुल्क - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून भाजपा राज्यातील मोठा पक्ष ठरलाय. मात्र, अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.

Maharashtra Assembly Election 2024 loser candidates demand recounting of vvpat votes in Chhatrapati Sambhajinagar
पराभूत उमेदवारांची व्हीव्हीपॅट मोजणीची मागणी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2024, 1:58 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले. काही ठिकाणी पराभूत उमेदवारांनी झालेल्या मतमोजणी बाबत आक्षेप घेतला. तर काही जणांनी व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी (Recounting of VVPAT Votes) विनंती अर्ज देखील केले. यासंदर्भात राज्यातील 22 उमेदवारांनी अर्ज केले असून जिल्ह्यातील शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्यासह अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी या मतमोजणीची मागणी केलीय. तर सिल्लोड येथील उमेदवार सुरेश बनकर यांनी या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय.

मध्य मतदार संघाच्या उमेदवारानं भरले पैसे : जिल्ह्यात शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवारांनी मतमोजणीत तफावत असल्याचा आरोप केलाय. तसंच काही मतदान केंद्रातील मतमोजणी योग्य पद्धतीनं झाली नसल्याची तक्रार देखील पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. जिल्ह्यातील पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे (उबाठा) पराभूत उमेदवार राजू शिंदे आणि मध्य विधानसभा मतदार संघातील बाळासाहेब थोरात यांनी व्हीव्हीपॅट मोजणी करण्याची मागणी केलीय. इतकंच नाही तर बाळासाहेब थोरात यांनी मतदान केंद्रातील मोजणीसाठी लागणारे 47,200 रुपये प्रति मतदान केंद्राप्रमाणे दोन केंद्रांचे 94 हजार 400 रुपये निवडणूक विभागात भरले आहेत. यासंदर्भातील माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली. त्याचबरोबर कन्नड येथील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी देखील आयोगाकडं तक्रार नोंदवली आहे.

सिल्लोड मतमोजणी वादात : जिल्ह्यातील सिल्लोड मतदार संघात राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपामधून शिवसेनेत (उबाठा) आलेल्या सुरेश बनकर यांच्यातील लढत महत्त्वाची ठरली. बनकर यांनी चांगले मताधिक्य मिळवत आघाडी घेतली असताना शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये अचानक सत्तार यांनी आघाडी घेत विजय मिळवला. त्यामुळं मतमोजणी करत असताना चुकीची आकडेवारी जाहीर करण्यात आल्याचा आरोप सुरेश बनकर यांनी केलाय. तसंच या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

पुन्हा मतमोजणीसाठी लागेल न्यायालयीन परवानगी : निवडणुकीच्या निकालावर अनेक उमेदवारांनी आपला आक्षेप नोंदवलाय. मात्र, नव्याने मतमोजणी करण्याचा निर्णय घेणे आयोगाला शक्य नाही. जर एखाद्या उमेदवाराला सर्व मतमोजणी पुन्हा करायची असेल, तर न्यायालयातूनच ती परवानगी मिळवावी लागते. त्यानंतर नियमानेच पुढची कारवाई होऊ शकते, अशी माहिती निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी दिलीय.

हेही वाचा -

  1. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ अन् 15 टक्के मतं सेट? मतमोजणी प्रक्रियेवर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले...
  2. ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून दिलासा, 'या' मतदारसंघामध्ये होणार फेरमतमोजणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.