ETV Bharat / state

"मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार"; विनोद तावडेंनी स्पष्टच सांगितलं

जर आम्ही पैसे वाटले असल्यास सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि निवडणूक आयोगाने चौकशी करावी, मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया विनोद तावडेंनी दिलीय.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना आणि मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. नालासोपारा येथे भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोपावरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गदारोळ केलाय. त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना नजरकैदेत ठेवलेय. या आरोपानंतर हॉटेल विवांता येथे मोठे तणावाचे वातावरण तयार झाले होते. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना गराडा घातला होता. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतलीय. दरम्यान, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपा नेते विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय.

कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार : सत्ताधारी भाजपा केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. पैसे वाटल्याच्या प्रकरणानंतर भाजपावर सर्वच राजकीय पक्ष टीका करी आहेत. आता याबाबत विनोद तावडे यांनीही स्पष्टीकरण दिलंय. मी वाड्यावरून परतत असताना आचारसंहितेचे काय नियम असतात, ते भंग होऊ नयेत याचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो. आम्ही पैसे वाटत नव्हतो, जर आम्ही पैसे वाटले असल्यास सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि निवडणूक आयोगाने चौकशी करावी, तपास करावा, मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिलीय. तर दुसरीकडे संजय राऊत यांनीही विनोद तावडेंवर निशाणा साधलाय. भाजपाने पैसे वाटपाचे कितीही लपवले, तरी सर्व कॅमेऱ्यासमोर आहे. भाजपाचा खरा चेहरा समोर आला असून, त्यांचा खेळ आता संपलाय. भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांकडे पाच कोटी रुपये कुठून आले? ते मतदारांना वाटण्यासाठीच घेऊन गेले होते. महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात किमान 15 कोटी रुपये पोहोचले आहेत. आमच्या बॅगा निवडणूक आयोग चेक करीत होते, पण आता या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली पाहिजे. जे काम निवडणूक आयोगाने केले पाहिजे होते, ते काम बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलंय. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.

तावडे-ठाकूर एकाच गाडीतून प्रवास : विनोद तावडे हे पैसे वाटप करीत असल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. एकीकडे हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावर आरोप केले आणि पत्रकार परिषदेनंतर तावडे आणि ठाकूर यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्यात. तर दुसरीकडे पैसे वाटपावरून नालासोपारा-विरारमध्ये मोठा राडा झालाय. यानंतर इथे तीन ते चार तास मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर याचे पडसाद आणि भूकंप डहाणूत पाहायला मिळाले. कारण बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी आज भाजपात प्रवेश केलाय. ते यापूर्वी भाजपा पक्षातच होते. भाजपातून त्यांनी नुकतेच ते बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला होता. मात्र त्यांनी आज पुन्हा एकदा घरवापसी करीत भाजपा प्रवेश केलाय. दरम्यान, त्यांनी भाजपाचे उमेदवार विनोद मेडा यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे आता डहाणू भाजपाची ताकद वाढलीय.

आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई : नालासोपारा येथे माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी तयार करण्यात आलेले निवडणूक यंत्रणेचे भरारी पथकही घटनास्थळी पोहोचले. फ्लाइंग स्क्वॉडने परिसराचा आढावा घेतला आणि संबंधित कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असंही अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी सांगितलंय.

हेही वाचाः

नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; पैसे वाटल्याचा आरोप, विनोद तावडेंना घेरलं

अनिल देशमुख यांच्या वाहनावर 'इतक्या' जणांनी केलीदगडफेक; नारे लावत गेले निघून, तक्रारीत नमूद केला 'हा' घटनाक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.