ETV Bharat / state

मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले... - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

महाराष्ट्राने जो निकाल दिलाय, त्यावरून देवेंद्र फडणवीस हे फक्त राज्यातच नाही तर देशातही भाजपासाठी आता महत्त्वाचे नेते बनले आहेत.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2024, 3:04 PM IST

Updated : Nov 23, 2024, 3:13 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजपाने किंबहुना महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिलाय. या यशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी," एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है", अशा आशयाचे ट्विट केले आहे. यावरून विरोधकांची बोलती बंद झालीय. विशेष म्हणजे महायुतीच्या घवघवीत विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवादही साधलाय. हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत. विरोधकांना जनतेने कृतीतून उत्तर दिले आहे. आम्ही सांगितले होते आम्ही अभिमन्यू आहोत आणि चक्रव्ह्यू आम्ही भेदला. विशेष करून मी लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो ज्यांनी आम्हाला आशीर्वाद देऊन आमच्यावर विश्वास ठेवला. लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवला गेला होता, त्याला यंदाच्या निवडणुकीत जनतेने उत्तर दिले आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

मुख्यमंत्रिपदाबाबत आमच्यात कुठलाही वाद नाही: राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार असे विचारले असता ते म्हणाल की, मुख्यमंत्रिपदाबाबत आमच्यात कुठलाही वाद नाही. हे आम्ही अगोदरच ठरवलेलं आहे की, निवडणुकीनंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील, असंही त्यांनी सांगितलंय.

लोकसभेचा वचपा काढला : राज्यात भाजपाने विधानसभा निवडणुकीचे घवघवीत यश संपादन केलंय. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, एक है तो सेफ है मोदी है तो मुमकीन है, अशा पद्धतीचं सूचक ट्विट केलंय. विशेषतः आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला मोठी हार पत्करावी लागली होती आणि त्याची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी उचलत राज्यातून पायउतार होण्याचं ठरवलं होतं. परंतु केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकत जी विधानसभेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ती जबाबदारी अन् तो विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी सार्थ ठरवलाय. महाराष्ट्राने जो निकाल दिलाय, त्यावरून देवेंद्र फडणवीस हे फक्त राज्यातच नाही तर देशातही भाजपासाठी आता महत्त्वाचे नेते बनले आहेत.

फडणवीस मुख्यमंत्रिपदाचे दावेदार : भाजपाने राज्यात विधानसभेच्या 149 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी तब्बल 130 जागांवर त्यांना आघाडी मिळालेली आहे. या कारणास्तव भाजपाचा स्ट्राइक रेट जवळपास 85 टक्क्यांवर गेलाय. याबाबत बोलताना भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे की, धर्मयुद्ध आणि एक है तो सेफ है, हा महायुतीचा नारा राज्याच्या जनतेने मान्य केलाय. तसेच राज्यात महायुती 200 चा आकडा पार करेल, असेही दरेकर म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने उभा आहे. ज्यांच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असं एकंदरीत समीकरण ठरलेलं आहे. या कारणाने मुख्यमंत्रिपदाचे दावेदार हे देवेंद्र फडणवीस असल्याचंही ते म्हणालेत.

शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जिवंत ठेवली : तसेच भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनीही या विजयावर प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जे भरघोस मतदान केलंय, त्यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदास आठवले यांनी जे काम केलंय. त्यावरून अप्रत्यक्ष लाभाचे राजकारण आणि प्रत्यक्ष लाभाचे राजकारण महायुती सरकारने केल्यामुळे जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला. भाजपा-शिवसेनेची जी नैसर्गिक युती होती, ती शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी 2019 ला तोडली. त्याचा एक विशिष्ट राग बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये होता. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिवंत ठेवल्याचंही विनोद तावडेंनी अधोरेखित केलंय.

हेही वाचा -

  1. विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोण आघाडीवर? जाणून घ्या, राजकीय अन्वयार्थ
  2. राज्यात सहा जागांवर रंगतदार लढत, बालेकिल्ला वाचवण्याचे पवार अन् शिंदेंपुढे आव्हान

Last Updated : Nov 23, 2024, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.