ETV Bharat / state

'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता; काय आहेत कारणे? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

आता 'बटेंगे तो कटेंगे' मुळे महायुतीच्या विरोधात वातावरणनिर्मिती होत असल्याचं पाहायला मिळतंय. या घोषणेमुळं मतदार, जनता नाराज होत असून, त्याचा फटका निवडणुकीत महायुतीला बसू शकतो.

Grand Alliance
महायुती (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2024, 5:21 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीतील सोमवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं आज शेवटच्या टप्प्यात उमेदवार आणि नेते मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मागील एक महिन्यापासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी-विरोधकांनी एकमेकावर चांगलीच चिखलफेक केलीय, प्रचारात टीका करताना अनेक नेत्यांची जीभ घसरली, तर काही नेत्यांचा भाषेचा स्तर देखील खालावल्याचं पाहायला मिळालं. वैयक्तिक पातळीवर जाऊन उणीधुणी काढण्यात आलीत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत 'लाडकी बहीण' ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार अशी शक्यता वर्तविली जात होती. विशेष म्हणजे तशी वातावरणनिर्मिती महायुतीनं केली होती. परंतु गेल्या आठवड्यापासून 'बटेंगे तो कटेंगे' हा नारा दिल्यामुळं जी वातावरणनिर्मिती महायुतीनं केली होती किंवा जी आपल्या बाजूंनी अनुकूल परिस्थिती महायुतीनं तयार केली होती. त्याला आता 'बटेंगे तो कटेंगे' या प्रचारामुळं तडा गेल्याचं दिसतंय. महायुतीच्या विरोधात वातावरणनिर्मिती होत असल्याचं पाहायला मिळतंय. परिणामी 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेमुळं मतदार, सामान्य जनता नाराज होत असून, त्याचा फटका निवडणुकीत महायुतीला बसू शकतो. या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलंय. खरंच महायुतीला 'बटेंगे तो कटेंगे'वरून नुकसान होईल का? आणि याची कारणे काय आहेत. पाहू यात...

लोकसभेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता? : मे 2024 मध्ये देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. यावेळी महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर 'भटकती आत्मा' आणि 'उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे नकली संतान' अशी टीका केली होती. तर लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजपा संविधान बदलणार, असा प्रचार केला होता. याचा फायदा महाविकास आघाडीला निवडणुकीत दिसून आला. मात्र लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत नको, यासाठी महायुतीने अधिक सावधगिरी आणि खबरदारी बाळगली होती. यात प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ते यशस्वीही झाले. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात येऊन 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा दिला आणि तिथेच चित्र बदलल्याचे दिसून आले. महायुतीने आपल्या बाजूंनी जी वातावरणनिर्मिती केली होती. पण एका 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेमुळं महायुतीच्या विरोधात फासे पडत आहेत, असं दिसतंय. केंद्रातील अनेक नेते महाराष्ट्रात येऊन प्रचार करीत आहेत. पण सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'बटेंगे तो कटेंगे' चा नारा दिला. याचा कित्ता राज्यातील भाजपा नेत्यांनी गिरवला. मात्र जनतेला हे पटलेलं दिसत नाहीय, यावरून लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. भाजपा समाजात जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करीत आहे, अशी धारणा लोकांची होत चालली आहे. जाती, धर्माशिवाय भाजपा निवडणूक लढवू शकत नाही का? असं जनसामान्यांना वाटतंय. या सर्वांचा परिणाम म्हणून 'बटेंगे तो कटेंगे' यामुळं महायुतीला विधानसभा निवडणुकीत फटका बसेल, याचे त्यांना परिणाम भोगावे लागतील, असं राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलंय.

महायुतीतच मतभिन्नता : एकीकडे महायुतीने 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा दिलाय. हा नारा म्हणजे हिंदूंनी एकत्र व्हावे. एकत्र राहावे आणि या नाऱ्यातून अप्रत्यक्षरीत्या मुस्लिम मतदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेलाय. परंतु दुसरीकडे महायुतीतच 'बटेंगे तो कटेंगे' या प्रचारातील घोषणेवरून त्यांच्यातच एकवाक्यता किंवा समन्वय दिसून येत नसल्याचं चित्र आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 'बटेंगे तो कटेंगे' याला विरोध केलाय. तसेच आमदार पंकजा मुंडे यांनीही 'बटेंगे तो कटेंगे' हा चुकीचा प्रचार असल्याचं म्हटलंय. आपण याचे समर्थन करत नसल्याचं मुंडेंना म्हटलंय. दरम्यान, अजित पवार किंवा अशोक चव्हाण हे बाहेरून आलेले आहेत, मात्र पंकजा मुंडे ह्या मूळ भाजपातील आहेत आणि त्यांनीच 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध केल्यामुळं महायुतीतच एकवाक्यता किंवा त्यांच्यात मतभिन्नता दिसून येत आहे. दरम्यान, 'बटेंगे तो कटेंगे' या प्रचारावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आता सारवासारव करावी लागत असल्याचं दिसून येतंय.

त्यांच्यातच आलबेल नाही : प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात लाडकी बहीण योजनेमुळं महायुतीचा प्रचार व्यवस्थित सुरू होता. मात्र आता प्रचाराच्या शेवटच्या दिवसात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा दिल्यानंतर हा नारा भाजपाच्याच अंगाशी येत असल्याचं चित्र आहे. सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा दिल्यानंतर वोट जिहादवरून धर्मयुद्धाची भाषा करणारे देवेंद्र फडणवीसांनादेखील लक्ष्य केलं जातंय. परिणामी महायुती आणि मुख्यत: भाजपा कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. 'बटेंगे तो कटेंगे' वरून भाजपावर सर्व बाजूंनी टीकास्त्र डागलं जात असल्याचं पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याचा उच्चार सभेत टाळला. परिणामी आपल्यावर टीका होत आहे हे लक्षात आल्यामुळं भाजपाने घूमजाव केलाय. तर 'बटेंगे तो कटेंगे' वरून महायुतीतच आलबेल नसल्याचं चित्र आहे, अशी टीका मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना केलीय. दुसरीकडे अजित पवार, पंकजा मुंडे आणि अशोक चव्हाण यांनी 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध केलाय. अशोक चव्हाण आणि अजित पवार हे बाहेरून आले आहेत हे समजू शकतो, पण त्यांच्याच घरातील पंकजा मुंडे यांनी याला विरोध केल्यामुळं आता भाजपा चांगलीच अडचणीत सापडलीय. 'बटेंगे तो कटेंगे'मुळं निवडणुकीत महायुतीला फटका बसू शकतो, त्यांचे नुकसान होऊ शकते, असंही मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते यांनी म्हटलंय.

गैरसमज पसरवला जातोय : 'बटेंगे तो कटेंगे'चा आम्ही नारा दिलाय. परंतु याचा कुठेही आम्हाला निवडणुकीत फटका बसणार नाही किंवा निवडणूक निकालात याचे परिणाम दिसून येणार नाहीत. कारण आम्ही 2014 पासून 2019 पर्यंत केलेली कामं जनतेसमोर ठेवलीत. आणि मागील दोन-अडीच वर्षांत महायुती सरकारने केलेली विकासकामांच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवतोय. या निवडणुकीत जनता आमची कामं बघून मतं देईल, 'बटेंगे तो कटेंगे' यामुळं आमचे काहीही नुकसान होणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिलीय. 'बटेंगे तो कटेंगे'चा फटका कुठेही आम्हाला बसणार नाही. निकाल आमच्याच बाजूनं लागेल. विजय हा आमचाच आहे. महायुतीच्या 150 ते 160 जागा येतील. पण 'बटेंगे तो कटेंगे'बाबत विरोधक गैरसमज पसरवतायत, अशी टीकाही प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केलीय.

हेही वाचा

  1. महाराष्ट्रातील 7 लाख कोटी किमतीचे प्रकल्प राज्याबाहेर गेले-राहुल गांधी
  2. 80 टक्के समाजकारण अन् 20 टक्के राजकारण हाच आमचा ध्यास- मंगेश कुडाळकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.