ETV Bharat / state

'ही लढाई कोणा राजपुत्राची नसून...' अमित ठाकरेंनी मानले माहीममधल्या मतदारांचे आभार - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

अमित ठाकरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. आता अमित ठाकरे यांनी आपला पराभव मान्य करत सोशल मीडिया पोस्टद्वारे माहीममधील मतदारांचे आभार मानले आहेत.

amit thackeray
अमित ठाकरे (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2024, 6:03 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होतेय. त्यात सर्वांचे लक्ष लागलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी आपला झेंडा रोवण्यात यश मिळवल्याचे दिसून येतेय. या निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने हा मतदारसंघ चर्चेत आला होता. मात्र, आता निवडणुकीच्या निकालातून या मतदारसंघाचं चित्र स्पष्ट झालं असून, अमित ठाकरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. आता अमित ठाकरे यांनी आपला पराभव मान्य करत सोशल मीडिया पोस्टद्वारे माहीममधील मतदारांचे आभार मानले आहेत.

राज ठाकरे यांना मोठा झटका: माहीम विधानसभा मतदारसंघातील निकाल राज ठाकरे यांना मोठा झटका मानला जात असून, ही एका राजपुत्राची लढाई असल्याचं म्हटले जात होतं. यालाच आता अमित ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे उत्तर दिले आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अमित ठाकरे म्हणतात की, माहीम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे. आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो.

अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं : पुढे अमित ठाकरे लिहितात की, गेली अनेक वर्षे या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो. मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे.

आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही : "माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती. कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची - जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं. आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; एक नवी सुरुवात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहीम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी मी 24 तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही. मी वचन देतो की, तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू! आपलाच, अमित ठाकरे" असं म्हणत अमित ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट द्वारे माहीम मधील मतदारांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा -

  1. विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोण आघाडीवर? जाणून घ्या, राजकीय अन्वयार्थ
  2. राज्यात सहा जागांवर रंगतदार लढत, बालेकिल्ला वाचवण्याचे पवार अन् शिंदेंपुढे आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.