मुंबई: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या विचारांचे अनुयायी दादरच्या चैत्यभूमीला येत असतात. यावर्षीदेखील लाखो अनुयायांची गर्दी दादरच्या चैत्यभूमी परिसरात पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दादर चैत्यभूमी परिसरात तैनात करण्यात आला आहे.
Live Updates-
- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हणाले, "भारतीय लोकशाही ही जगातील सर्वोत्तम लोकशाही आहे. डॉ.आर. आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. ही एक महान लोकशाही आहे. येथे हजारो जाती, विविध भाषा बोलणारे आणि विविध धर्माचे लोक येथे राहतात. तरीही आपला अखंड आहे. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करतो".
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिवस निमित्तानं संसद भवन लॉन्स येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
#WATCH | Delhi: On the occasion of 69th #MahaparinirvanDiwas, Union Minister Ramdas Athawale says, " indian democracy is the best democracy in the world. the constitution given by br ambedkar, this is a great democracy. there are thousands of castes, people who speak different… pic.twitter.com/4TYEypDEtD
— ANI (@ANI) December 6, 2024
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले," देशाची वेगाने प्रगती हे संविधानाचे यश आहे. डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनाकडं पाहून थक्क होतो. बाबासाहेब एक व्यक्ती नव्हे तर संस्था होते. देशापुढील कोणत्याही समस्येचं उत्तर संविधानात मिळते".
लोकशाही राज्यघटना लिहून भारतात लोकांचे राज्य निर्माण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी, महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी आपले अमूल्य योगदान दिले. आधुनिक भारताचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम! pic.twitter.com/RUQrZS4rdf
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 6, 2024
संविधानाचे शिल्पकार,भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन.बाबासाहेबांच्या विचारांची मशाल घेऊनच पुढे चालण्याचा संकल्प करुया. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन...!#जयभीम
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 6, 2024
💫Ai Generated image. pic.twitter.com/gqPcWMEEyC
- नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे दाखल झाले आहेत. महायुती सरकारमधील तीनही प्रमुख नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण अभिवादन केले.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi pays tribute to Dr BR Ambedkar at the Parliament House Lawns on the occasion of 69th #MahaparinirvanDiwas
— ANI (@ANI) December 6, 2024
(Source: DD News) pic.twitter.com/4bdfgpmaBG
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी उशिरा रात्री कोर्ट नाका परिसरातील भारतरत्न डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस साजरा केला जातो.डॉ. आंबेडकर यांनी अर्थतज्ज्ञ, घटनातज्ज्ञ, विचारवंत आणि सुधारक म्हणून देशाच्या प्रगतीत योगदान दिले. त्यांनी आपले जीवन समतेसाठी आणि जाति-आधारित भेदभाव निर्मूलनासाठी समर्पित केले.
हेही वाचा-