सातारा Mahabaleshwar land scam case: महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावातील तब्बल ६४० एकर जमीन बळकावल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आज (११जून) सुनावणी होणार आहे. याबाबत अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळविंसह तिघांना नोटीस बजावून सुनावणीला हजर राहण्यास सांगितलं आहे.
अहमदाबादच्या जीएसटी आयुक्ताने महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावची संपूर्ण ६४० एकर जमीन बळकावल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी जीएसी आयुक्तासह तिघांना नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणात आज जिल्हाधिकाऱ्यांसमारे सुनावणी होणार आहे.
काय आहे जमीन घोटाळा प्रकरण: गुजरातमधील अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि नातेवाईकांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) हे संपूर्ण गावच खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर साताऱ्यातील कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी 'सह्याद्री वाचवा', या मोहिमेंतर्गत आरटीआयमधून मागवलेल्या माहितीमधून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रकांत वळवींसह तिघांना नोटीस बजावून ११ जून रोजी खरेदीदस्त, फेरफार, सातबारा उतारे घेऊन हजर राहण्यास सांगितले आहे. गैरहजर राहिल्यास अथवा कागदपत्रे सादर न केल्यास महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमन १९६१ नुसार कार्यवाही केली जाणार आहे. जमीन धारणेची कमाल मर्यादपेक्षा जास्त धारण केलेली जमीन सरकारजमा केली जाईल, असंही नोटीसामध्ये नमूद केलं आहे. .
बेमुदत उपोषणाला ग्रामस्थांचा पाठींबा: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात जीएसटी आयुक्तांनी केलेल्या बेकायदेशीर रिसॉर्टचे बांधकामावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्यानं कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. झाडाणी ग्रामस्थांनी उपोषणस्थळी येवून आपला पाठिंबा दिला आहे. जमिनी विक्री करणारे एजंट संजय मोरे आणि आनंद शेलार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीदेखील झाडाणी ग्रामस्थांनी केली आहे.
- मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश: मुख्यमंत्री सुट्टीवर आपल्या दरे गावी आले असता त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
हेही वाचा