ETV Bharat / state

'वादळवाट' 'आभाळमाया' चे गीतकार मंगेश कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. त्याची शीर्षकगीते आजही लोकप्रिय आहेत.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Mangesh Kulkarni Passed Away
मंगेश कुलकर्णी यांचं निधन (File Photo)

मुंबई : प्रसिध्द गीतकार, अभिनेता आणि लेखक अशा भूमिका निभावणाऱ्या मंगेश कुलकर्णी (Mangesh Kulkarni) यांचं निधन झालं. कुलकर्णी यांनी पटकथाकार म्हणूनही हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उल्लेखनीय काम केलं होतं. कुलकर्णी यांचं शनिवारी दुपारी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.

चित्रपटासाठी केल लेखन : दूरचित्रवाणीवर गाजलेल्या लाईफ लाईन या मालिकेची पटकथा त्यांनीच लिहिली होती. तर विजया मेहता यांनी त्या मालिकेचे दिग्दर्शन केलं होतं. १९९७ मध्ये आलेल्या येस बॉस या शाहरुख खानच्या चित्रपटाची पटकथा देखील त्यांनी लिहिली होती. लपंडाव या मराठी चित्रपटाच्या लेखनाने त्यांनी प्रारंभ केला होता. 'दिल क्या करे', 'गुलाम ए मुस्तफा', 'राजा को रानी से प्यार हो गया' या हिंदी चित्रपटासाठी कुलकर्णी यांनी लेखन केलं होतं.

बस प्रवासात सुचले शीर्षकगीत : २००२ मध्ये त्यांनी आवारा पागल दिवाना चित्रपटाची पटकथेचं लिखाण केलं होतं. मराठीबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या लेखनानं मोठं योगदान दिलं . २०१७ मध्ये त्यांनी फास्टर फेणे या रहस्यमयी गुन्हेगारी मालिकेचे लेखन केलं होतं. 'आभाळमाया'चे शीर्षकगीत त्यांना बस प्रवासात सुचले होते. त्यामुळं त्यांनी त्याच्या ओळी बसच्या तिकीटावर लिहिल्याची आठवण कुलकर्णी यांनी एकदा सांगितली होती.

सोशल मीडियावर श्रध्दांजली : मंगेश कुलकर्णी यांनी मराठी मालिकांच्या शीर्षकगीतांना एक वेगळ्याच उंचीवर नेले होतं. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पटकथाकार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. कुलकर्णी यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रध्दांजली अर्पण करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत.

हेही वाचा -

  1. ज्येष्ठ संस्कृततज्ञ, लेखक, पत्रकार पं. वसंतराव गाडगीळ यांचं निधन
  2. ज्येष्ठ मराठी दिग्दर्शक एन. रेळेकर काळाच्या पडद्याआड, आयुष्याची खडतर अखेर
  3. "गुटगुटीत म्हणून चिडवायचो, पण कर्करोग झाल्यानंतर..." बालपणीच्या मित्राबाबत राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.