thumbnail

महाराष्ट्रातील १५० आणि विदर्भातील ४० जागेवर भारत जोडो अभियानाचे कार्यकर्ते काम करतील - योगेंद्र यादव

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रकियेस प्रारंभ झाला आहे. अद्याप ही जागा वाटपाच्या संदर्भात महायुती किंव्हा महविकास आघाडीत एकमत झालेले दिसत नाही. मात्र,भाजपा आणि काँग्रेसकडून प्रचाराची रणनीती आखली जात आहे. काँग्रेसच्या प्रचारासाठी निर्धार स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक तथा राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव मैदानात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपाला बोल्ड करायचं असल्याचं म्हणाले आहे. ते आज नागपूर येथे आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते.

150 जागांवर काम करणार : महाराष्ट्रातील 288 पैकी 150 जागांवर काम करणार असून, आमचा विदर्भातील 62 पैकी 40 जागांवर फोकस राहणार आहे. या निवडणुकीत भाजपाला बोल्ड करायचं आहे. लाडकी बहीण योजनेचा महायुतीला थोडा फायदा होत असल्याचं निरीक्षणावरून दिसून येते. मात्र आम्ही काँग्रेसची महालक्ष्मी योजना यापेक्षा कशी चांगली आहे. हे पटवून देत आहोत. जिथे इंडिया आघाडी उमेदवार देईल. तेथे आम्ही समर्थन देऊन त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असं योगेंद्र यादव म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.