ETV Bharat / state

Lok Sabha Elections : देशात पहिल्यांदा ‘या’ लोकांच्या घरोघरी मतदानाची सोय, निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा - EC Press Conference

loksabha Election 2024 : देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत यावेळी काही लोकांना घरातून मतदान करता येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे.

Lok Sabha Election 2024 Election Commission has announced vote will be taken at home for those over age 85 years
देशात पहिल्यांदा ‘या’ लोकांच्या घरोघरी मतदानाची सोय, निवडणुक आयुक्तांची मोठी घोषणा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 5:52 PM IST

Updated : Mar 16, 2024, 6:50 PM IST

नवी दिल्ली loksabha Election 2024 : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज (16 मार्च) नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. यावेळी राजीव कुमार यांनी निवडणुकीची तयारी आणि मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधांची देखील माहिती दिली.

मुख्य निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा : लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी राजीव कुमार यांनी एक मोठी घोषणा केली. देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच निवडणूक आयोग हे लोकांच्या घरी जाऊन मतदान घेणार आहे. राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तींचं वय 85 वर्षांपेक्षा जास्त आहे, तसंच ज्यांना 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व आहे, अशा व्यक्तींच्या घरी जाऊन आयोगाचे कर्मचारी त्यांचं मत घेतली. अशा व्यक्ती फॉर्म डीच्या माध्यमातून मत देऊ शकतील, असंही त्यांनी सांगितलं.

राजीव कुमार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे -

  • देशात 97 कोटींपेक्षा जास्त मतदार
  • 96.8 कोटी मतदार मतदान करणार
  • दीड कोटी निवडणूक अधिकारी
  • साडेदहा लाख पोलींग बूथ
  • 55 लाखांपेक्षा अधिक EVM मशीन चा वापर केला जाणार
  • 1.82 कोटी नवीन मतदार मतदान करणार
  • 82 लाख प्रौढ, 48 हजार तृतीयपंथ, 49.7 पुरुष, 47.1 महिला मतदान करणार
  • देशात साडेदहा लाखांपेक्षा अधिक मतदान केंद्र
  • 100 वर्षांपेक्षा जास्त दोन लाख मतदार
  • महिलांसह तरुण मतदारांमध्येही वाढ
  • तरुण केवळ मतदान करणार नाहीत तर अ‍ॅम्बेसेडरही बनतील
  • प्रत्येक बूथवर पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहाची सोय
  • पोलिंग बूथवर येऊ न शकणाऱ्यांसाठी घरोघरी मतदानाची सोय (85 वर्षांच्या वर वय असणारे)
  • दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअरची सुविधा
  • मतदारांसाठी ऑनलाईन माहितीची सुविधा
  • उमेदवारांची माहितीही ऑनलाईन मिळणार

हेही वाचा -

  1. Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, राज्यात 5 टप्प्यात निवडणूक
  2. लोकसभा निवडणूक जाहीर, देशात आचारसंहिता लागू; जाणून घ्या आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?
  3. LIVE : लोकसभा निवडणुका जाहीर; निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद लाईव्ह

Last Updated : Mar 16, 2024, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.