ETV Bharat / technology

Yearender 2024: 2024 मध्ये भारतात लाँच झालेल्या टॉप टेन इलेक्ट्रिक कार - YEARENDER 2024

Yearender 2024: 2024 मध्ये भारतात अनेक इलेक्ट्रिक कार लाँच झाल्या. येथे आपण 400 किमी पेक्षा जास्त रेंज देणाऱ्या कारची माहीती देणार आहोत.

Yearender 2024
टॉप टेन इलेक्ट्रिक कार (Etv Bharat Hindi Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2024, 12:00 PM IST

हैदराबाद Yearender 2024 : 2024 वर्ष संपत आलं आहे. या वर्षानं भारतात इलेक्ट्रिक वाहनांना मोठी चालना दिली आहे. 2024 मध्ये इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत लक्षणीय वाढ झालीय. या वर्षी कार उत्पादक कंपन्यांनी अनेक इलेक्ट्रिक कार बाजारात लॉंच केल्या आहेत. आज आपण 2024 मध्ये लॉंच झालेल्या इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेणार आहेत. या कारची रेंज 400 किमी पेक्षा जास्त आहे.

महिंद्रा XEV 9e : स्वदेशी कार उत्पादक कंपनी महिंद्रानं नोव्हेंबर महिन्यातच ही कार लॉंच केली होती. यात 59kWh आणि 79kWh क्षमतेच्या दोन बॅटरी पॅकचा पर्याय आहे. मोठा बॅटरी पॅक याला 656 किमीची रेंज देतो आणि लहान बॅटरी पॅक या कारला 542 किमीची रेंज देते. कंपनीनं ही कार 21.90 लाख रुपयांपासून लॉंच केली आहे. यासोबत महिंद्रानं नवीन XEV 9e मध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत.

महिंद्रा BE 6e : XEV 9e सोबत कंपनीनं ही इलेक्ट्रिक SUV देखील बाजारात आणली आहे. कंपनीनं याला 59kWh च्या फक्त एका बॅटरी पॅकसह लॉंच केलं आहे, जी या कारला 556 किमी पर्यंतची रेंज देते. महिंद्रा BE 6e सुरुवातीची किंमत रु. 18.90 लाख (एक्स-शोरूम) आहे. या किफायतशीर किमतीसोबतच कंपनीनं यात अनेक आधुनिक फिचर्सही दिले आहेत.

Tata Curve EV : देशांतर्गत कार उत्पादक कंपनी Tata Motors नं ऑगस्ट 2024 मध्ये ही इलेक्ट्रिक SUV कूप भारतीय बाजारात लॉंच केली होती. कंपनी या इलेक्ट्रिक कारमध्ये 45kWh आणि 55kWh क्षमतेच्या दोन बॅटरी पॅकचा पर्याय देते. ही कार तिच्या पहिल्या बॅटरी पॅकसह 502 किमीची रेंज देऊ शकते, तर तिच्या दुसऱ्या बॅटरी पॅकसह 585 किमीची रेंज देते. टाटा कंपनी ही कार 17.49 ते 21.99 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान विकत आहे.

Tata Punch EV : कंपनीन जानेवारी 2024 मध्ये Tata Punch EV भारतीय बाजारात लॉन्च केले. कंपनी या इलेक्ट्रिक एसयूव्हीची 9.99 लाख ते 14.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान विक्री करत आहे. कंपनी 25kWh आणि 35kWh च्या दोन बॅटरी पॅकसह ही SUV विकते. तिची छोटी बॅटरी या कारला 315 किमीची रेंज देते, तर मोठी बॅटरी 421 किमीपर्यंतची रेंज देते.

Kia EV9 GT-Line : Kia या कोरियन कार कंपनीनं ऑक्टोबर 2024 मध्ये भारतीय बाजारपेठेत ही परफॉर्मन्स इलेक्ट्रिक SUV लाँच केली. कंपनीनं 99.8 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह इलेक्ट्रिक SUV बाजारात आणली. या बॅटरी पॅकमुळं ही कार 561 किमीची एआरएआय प्रमाणित श्रेणी देऊ शकते. सर्वात खास गोष्ट म्हणजे तिच्या मोटरचं पॉवर आउटपुट, 379bhp पॉवर आणि 700nm टॉर्क प्रदान करतं. कंपनी ही कार 1.30 कोटी रुपयांच्या (एक्स-शोरूम) किमतीत विकत आहे.

Mercedes-Benz EQS : जर्मन कार निर्मात्यानं सप्टेंबर 2024 मध्ये आपली इलेक्ट्रिक सेडान EQS भारतीय बाजारपेठेत लॉंच केली होती. कंपनीनं या सेडानची किंमत 1.62 कोटी रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. सेडानमध्ये AWD साठी दोन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत, ज्या 107.8 kWh च्या बॅटरीला जोडलेल्या आहेत. ही कार 857 किमी पर्यंत कमाल श्रेणी प्रदान करू शकते. त्याची इलेक्ट्रिक मोटर 516bhp पॉवर आणि 855nm टॉर्क जनरेट करते.

Volvo EX40 : कंपनीनं आपली इलेक्ट्रिक SUV XC40 रिचार्ज ऑक्टोबर 2024 मध्ये भारतीय बाजारात लॉंच केली होती, परंतु अलीकडेच कंपनीनं तिचं नाव बदलून EX40 केलं आहे. ही कार 56.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीला विकली जात आहे. या कारमध्ये 69kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे, जी या कारला 475 किमी पर्यंत कमाल रेंज देते. ही SUV RWD कॉन्फिगरेशनसह येते, ज्यामुळे तिच्या मागील बाजूस एक इलेक्ट्रिक मोटर स्थापित केली आहे, जी 238bhp पॉवर आणि 420nm टॉर्क प्रदान करते.

BMW i5 : लक्झरी कार उत्पादक BMW नं एप्रिल 2024 मध्ये आपली इलेक्ट्रिक सेडान BMW i5 भारतीय बाजारपेठेत लॉंच केली. कंपनी सध्या ही कार 1.20 कोटी रुपयांच्या (एक्स-शोरूम) किमतीत विकत आहे. ही कार i5 M60 xDrive या एकाच प्रकारात येते, ज्याची बॅटरी 83.9 kWh आहे. ही बॅटरी 516 किमी पर्यंत कमाल रेंज देते. कार AWD सेटअपसह येते, समोर आणि मागील एक्सलवर प्रत्येकी एक मोटर आहे, जी 601bhp पॉवर आणि 795nm टॉर्क प्रदान करते.

Mini Countryman Electric : MINI नं जुलै 2024 मध्ये भारतीय बाजारात कंट्रीमन इलेक्ट्रिक कार लाँच केली. ही कार एक छोटी हॅचबॅक आहे, परंतु असं असूनही तिच्यात शक्तीची कमतरता नाही. कंपनी ती फक्त एकाच प्रकारात विकते. कंट्रीमॅन इलेक्ट्रिक ई, जे FWD सेटअपसह येते. त्याची इलेक्ट्रिक मोटर 201bhp पॉवर आणि 250nm टॉर्क प्रदान करते. याला उर्जा देण्यासाठी, कारला 66.45 kWh चा बॅटरी पॅक मिळतो, जो तिला 462 किमी पर्यंत कमाल श्रेणी देतो.

BYD eMax 7 : चिनी कार कंपनी BYD अनेक इलेक्ट्रिक उत्पादने भारतीय बाजारपेठेत विकत आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये, कंपनीनं तिची BYD eMAX 7 भारतात लाँच केली. 55.4 kWh आणि 71.8 kWh या दोन बॅटरी पर्यायांसह कंपनीनं ही कार सादर केली. तिची छोटी बॅटरी 420 किमी पर्यंतची रेंज ऑफर करते, तिची मोठी बॅटरी कमाल 530 किमी पर्यंतची रेंज देते. BYD ही कार भारतीय बाजारपेठेत रु. 26.90 लाख ते 29.90 लाख (एक्स-शोरूम) मध्ये विकत आहे.

हे वाचलंत का :

  1. इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीनं ओलांडला 10 लाख युनिटचा टप्पा, वाचा कोण आहे एक नंबर?
  2. OnePlus 13 आणि OnePlus 13R 7 जानेवारी 2025 रोजी लॉंच होणार, सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर
  3. Samsung Galaxy S25 मालिकेच्या लाँचिंगची तारीख लीक, काय असेल खास?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.