ETV Bharat / state

उमेदवारीवरून महायुती-मविआत नाराजीनाट्य; काय आहेत नाराजीची कारणं? - Lok Sabha Elections - LOK SABHA ELECTIONS

Displeasure in Mahayuti and MVA : महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागावाटपाचा तिढा काही केल्या संपताना दिसत नाही. तसंच ज्या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्याठिकाणी मात्र नाराजीचा सूर ऐकायला मिळतोय.

Lok Sabha Elections Displeasure in Mahayuti and MVA over nomination
उमेदवारीवरून महायुती-मविआत नाराजीनाट्य; काय आहेत नाराजीची कारणं?
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 9:54 PM IST

मुंबई Displeasure in Mahayuti and MVA : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. तर अनेक ठिकाणी प्रचाराचा धुरळाही उडत आहे. प्रचारात विरोधक सत्ताधारी आमने-सामने येत आहेत. एकीकडं असं असतानाच दुसरीकडं महायुतीत आणि महाविकास आघाडीत जी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, त्या उमेदवारीवरून स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त केली जात असल्याचं बघायला मिळतंय. तर या नाराजीचं कारण काय? तसंच राज्यात कुठे आणि कशाप्रकारे नाराजी व्यक्त करण्यात येतेय? यासंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊया.

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ : सध्या उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत. येथे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, "अमोल कीर्तिकर हे कोरोनाकाळातील खिचडी प्रकरणातील भ्रष्टाचारी आहेत. लोकांच्या मनात अमोल कीर्तिकरांविषयी रोष आहे, ही जागा काँग्रेसला मिळणे अपेक्षित असताना ठाकरे गटाने अमोल कीर्तिकरांना उमेदवारी दिल्यामुळं आपण खिचडी चोराचा प्रचार करणार नाही. त्यांच्यासाठी काम करणार नाही.", असं म्हणत माजी खासदार आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

हेमंत गोडसे विरुद्ध छगन भुजबळ (नाशिक) : नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. मात्र, ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळं आपण महायुतीतील उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असं स्थानिक कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडं हेमंत गोडसेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, ही जागा आपणाला मिळावी अशी मागणी केलीय. तसंच जर उमेदवारी मिळाली नाहीतर गोडसे बंड सुद्धा करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही बोललं जातंय.

संजय मंडलिक (कोल्हापूर) : कोल्हापुरात शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांना महायुतीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र मंडलिक यांच्या उमेदवारीवरुन स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही प्रचार यांचा करायचा आणि काम मात्र काँग्रेसची होतात, असा नाराजीचा सूर भाजपा कार्यकर्त्यांचा आहे. तसंच "महत्त्वाच्या कामाचं जाऊ द्या, मंडलिक यांचे स्वीय सहाय्यक साधा फोनही उचलत नाहीत. मंडलिकांनी भाजपा कार्यकर्त्यांची कोणती कामं केली आहेत हे दाखवून द्यावे", असं म्हणत भाजपा कार्यकर्त्यांनी संजय मंडलिकांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

धैर्यशील माने (हातकणंगले) : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मानेंच्या उमेदवारीवरुन भाजपाचे केंद्रीय रासायनिक खत मंत्रालयाचे संचालक, पंचायत राज समितीचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपणाला जोपर्यंत सन्मान मिळत नाही तोपर्यंत प्रचार करणार नाही, अशी भूमिका संजय पाटील यांनी घेतली आहे. तसंच खासदार धैर्यशील मानेंबद्दल लोकांच्या मनात नाराजी असल्याचंही पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळं हातकणंगले जागेवरुन महायुती दुसरा उमेदवार देण्याचा तयारीत आहे. तसंच या ठिकाणचा उमेदवार बदलण्याचे संकेत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिले आहेत.

यवतमाळ-वाशिम : सध्या या ठिकाणी शिंदे गटाच्या भावना गवळी या खासदार आहेत. ही जागा शिंदे गटालाच मिळावी अशी स्थानिक कार्यकर्त्यांची भावना आहे. तसंच जर दुसरा उमेदवार दिला तर आपण त्यांच्यासाठी प्रचार करणार नाही. काम करणार नाही, असं शिवसेना कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. तसंच या ठिकाणी आपणाला उमेदवारी मिळावी यासाठी भावना गवळी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेटही घेतली आहे. त्यामुळं यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात कोणाची वर्णी लागते हे पाहावं लागेल.

सांगली : महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाकडून येथे महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. मविआत सांगलीच्या जागेवरुन चर्चा सुरू असताना, या जागेवर उमेदवार कसा काय दिला? याबाबत आपण दिल्लीत हायकमांडशी बोलणार असल्याचं आमदार विश्वजित कदमांनी म्हटलं होतं. तसंच सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथे जर काँग्रेसचा उमेदवार दिला नाही तर आम्ही प्रचार करणार नाही, असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलंय.

नवनीत राणा विरुद्ध आनंदराव आडसूळ आणि बच्चू कडू : महायुतीत अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आनंदराव आडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडं महायुतीतील घटक पक्ष बच्चू कडूंनी आपण राणांसाठी काम करणार नाही. त्यांचा प्रचार करणार नाही असं म्हटलंय. तसंच राणांचं निवडणुकीचं डिपॉझिट जप्त होईल असंही बच्चू कडू म्हणालेत. या ठिकाणी बच्चू कडूंनी प्रहार पक्षाचा उमेदवार नवनीत राणांच्या विरोधात उभा केला आहे.

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे हेमंत पाटील हे खासदार आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. महायुतीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता आणि जनतेच्या मनात काय चाललंय याचा विचार न करता हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं जर हेमंत पाटील पराभूत झाले तर आम्हाला जबाबदार धरू नका, असा इशारा माजी खासदार शिवाजी माने यांनी दिला आहे.

माढा : माढ्यातून भाजपानं रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. पण त्यांच्या उमेदवारीमुळं महायुतीतील नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नाराजी व्यक्त केलीय. यामुळं माढ्यात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना महायुतीतून संपू्र्ण साथ मिळणार की नाही, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

रावेरमध्ये नाराजीचा सूर : रावेर मतदारसंघात एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्यानं भाजपातील स्थानिक एकनिष्ठ कार्यकर्ते नाराज झालेत. येथे इच्छुक उमेदवार अमोल सावळे यांचं भाजपानं तिकीट कापल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसंच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना कार्यकर्त्यांनी पत्र लिहून सावळेंवर पुन्हा अन्याय झाल्याचं म्हटलंय.

हेही वाचा -

  1. Vasant Chavan Info : 'वंचित'चा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा; काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांचा दावा - Lok Sabha Election
  2. राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा रासपला - तटकरे - NCP State President Sunil Tatkare
  3. रामटेकमध्ये काँग्रेसची टाईट; कोण देणार फाईट? 'वंचित'मुळं महाविकास आघाडीच्याही डोक्याला शॉट - Ramtek Lok Sabha elections

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.