नवी दिल्ली/मुंबई Lok Sabha Elections Date Phases Maharashtra : केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठीच्या तारखा निवडणूक आयोगानं सविस्तरपणे जाहीर केल्या आहेत.
![maharashtra lok sabha elections](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16-03-2024/21002007_maharashtra-lok-sabha.jpg)
राज्यात पाच टप्प्यात मतदान : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. राज्यासाठी ही लोकसभा निवडणूक विशेष असणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात बंड झाल्यानंतरची ही पहिलीच सर्वात मोठी निवडणूक असणार आहे. त्यामुळं कोणता पक्ष किती जागा जिंकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे रोजी मतदान होणार आहे.
देशात सात टप्प्यात मतदान : देशात लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यातील निवडणुका १९ एप्रिलला होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. पहिला टप्पा १९ एप्रिलला, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी, सहावा टप्पा २५ मे रोजी आणि शेवटचा सातवा टप्पा १ जून रोजी होणार आहे.
![election date](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16-03-2024/21002007_india-election-date.jpg)
पहिल्या दोन टप्प्यात विदर्भाचा नंबर : महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिल २०२४ रोजी पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांत मतदान होणार आहे. तर २६ एप्रिल २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यात ८ मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार असून, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे.
![eci](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16-03-2024/21002007_eci-maharashtra.jpg)
मुंबईत शेवटच्या टप्प्यात मतदान : तिसरा टप्पा ७ मे रोजी होणार असून, यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. चौथा टप्पा १३ मे रोजी पार पडणार असून, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांचा समावेश आहे. शेवटचा पाचवा टप्पा २० मे रोजी होणार असून, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे.
हेही वाचा -