ETV Bharat / state

नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज...मग मुंबईतील महायुतीच्या आमदारांचं काय? - Lok Sabha Election Result 2024 - LOK SABHA ELECTION RESULT 2024

Lok Sabha Election Result 2024 भाजपा आमदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी पराभूत झाल्यावर त्यांनी वायनाडचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्या पद्धतीनं आता आदित्य ठाकरे मतदार संघाच्या शोधात आहेत अशी टीका राणेंनी केली आहे. परंतु मुंबईत बरेच विधानसभा मतदार संघ आहेत, जिथं भाजपाचे आमदार आपल्या उमेदवाराचं मताधिक्य वाढवण्यात कमी पडले. तर मग त्यांचेही मतदारसंघ बदलले जातील का? वाचा सविस्तर..

Nitesh Rane challenge To Aditya Thakre
नितेश राणे यांचे आदित्य ठाकरे यांना चॅलेंज (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 9:09 AM IST

Updated : Jun 8, 2024, 12:54 PM IST

मुंबई Lok Sabha Election Result 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यातच नाही, तर मुंबईतील दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबईत ६ पैकी ६ जागा जिंकण्याचा दावा करणारे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मुंबईत जबरजस्त झटका बसला. मुंबईत महायुतीचा केवळ २ जागी विजय झाला. तर महाविकास आघाडीनं ४ जागा जिंकल्या. अशा परिस्थितीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील आदित्य ठाकरे यांच्या वरळी या विधानसभा मतदारसंघातून उबाठाचे उमेदवार अरविंद सावंत यांना ६४,८४४ मत मिळाली. यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून त्यांनी आता दुसऱ्या मतदार संघाचा शोध सुरू केला. हिम्मत असेल तर या मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज केलं आहे. परंतु वास्तविक पाहता आदित्य ठाकरे यांनी या मतदार संघातून अरविंद सावंत यांना ६,७१५ मतांचा लीड दिला आहे. पण मुंबईत असे बरेच विधानसभा मतदार संघ आहेत, जिथं भाजपाचे आमदार आपल्या उमेदवाराचं मताधिक्य वाढवण्यात कमी पडले आहेत. मग त्यांचंही मतदारसंघ बदलले जातील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

नितेश राणे (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले आहेत नितेश राणे? नितेश राणे म्हणाले आहेत की, "आदित्य ठाकरे यांना जनतेने नाकारले आहे. वरळीमध्ये त्यांची हार होणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी नवीन मतदार संघाचा शोध सुरू केला असून त्यांच्याकडं तीन पर्याय आहेत. एक अणुशक्ती नगर, दुसरा मुंबादेवी आणि तिसरा मुंब्रा. ज्या पद्धतीनं राहुल गांधी पराभूत झाल्यावर त्यांनी वायनाडचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्या पद्धतीनं आता आदित्य ठाकरे मतदार संघाच्या शोधात आहेत. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ते वरळी येथून निवडणूक लढवणार नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भाजपा आणि महायुतीवर टीका करण्यापूर्वी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना वरळीमधून निवडून आणावं, खरंच आदित्य बाळासाहेबांचा नातू असतील, तर त्यांनी माझं हे चॅलेंज स्वीकारावं," असेही नितेश राणे म्हणाले आहेत.

असे अनेक मतदार संघ: नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातील मताधिक्यावरुन त्यांच्यावर टीका केली. पण मुंबईत असे अनेक मतदार संघ आहेत जिथं महायुतीच्या आमदारांना आपल्या विभागातील उमेदवाराला लीड देण्यात अपयश आलं आहे. अशा परिस्थितीत ते आमदार सुद्धा दुसऱ्या मतदार संघाच्या शोधात आहेत का? हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो.

मुंबईतील लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये विधानसभा निहाय मते

उत्तर-पश्चिम मुंबई: उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात महायुतीचे विजय उमेदवार रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातच त्यांना कमी मतदान झालं. जोगेश्वरी पूर्व मध्ये रवींद्र वायकर यांना ७२,११८ तर अमोल कीर्तिकर यांना ८३,४०९ मत मिळाली. तर गोरेगावमध्ये भाजपाच्या आमदार विद्या ठाकूर यांच्या मतदारसंघांमध्ये रवींद्र वायकर यांना ९४,३०४ मत मिळाली तर अमोल कीर्तीकर यांना ७०,५६२ मत मिळाली.

उत्तर पूर्व मुंबई: उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघामध्ये घाटकोपर पश्चिम भाजपाच्या राम कदम यांच्या मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांना ७९,११७ मत मिळाली तर मिहीर कोटेचा यांना ६३,३७० मत मिळाली. त्याचप्रमाणे मानखुर्द शिवाजीनगर समाजवादी पक्षाचे अबू आझमी आमदार असलेल्या मतदारसंघात संजय दिना पाटील यांना सर्वाधिक १,१६,०७२ मत मिळाली, तर मिहीर कोटेचा यांना केवळ २८,१०१ मते मिळाली.

उत्तर मध्य मुंबई: उत्तर मध्य मुंबई मतदार संघात चांदिवली या शिंदे सेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना १,०२,९८५ मतं मिळाली तर उज्वल निकम यांना ९८,६६१ मते मिळाली. वांद्रे पश्चिम भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या मतदारसंघात उज्वल निकम यांना ७२,९५३ मतं मिळाली तर वर्ष गायकवाड यांना ६९,३४७ मत मिळाली. त्याचबरोबर कुर्ला शिंदे सेनेचे मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना ८२,११७ मतं मिळाली तर उज्वल निकम यांना ५८,५५३ मत मिळाली. वांद्रे पूर्व काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांच्या मतदार संघात सुद्धा वर्षा गायकवाड यांना ७५,०१३ मतं मिळाली तर उज्वल निकम यांना ४७,५५१ मतं मिळाली.

दक्षिण मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात वरळी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात अरविंद सावंत यांना ६४,८४४ तर यामिनी जाधव यांना ५८,१२९ मत मिळाली. मलबार हिल भाजपाचे मंगल प्रभात लोढा यांच्या मतदारसंघात यामिनी जाधव यांना ८७,८६० मत मिळाली तर अरविंद सावंत यांना ३९,५७३ मत मिळाली. मुंबादेवी काँग्रेसचे अमीन पटेल यांच्या मतदारसंघात अरविंद सावंत यांना ७७,४६९ मते मिळाली तर यामिनी जाधव यांना ३६,६९० मतं मिळाली.

दक्षिण मध्य मुंबई: दक्षिण मध्य मुंबई येथे अनुशक्ती नगर ,अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांच्या मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार अनिल देसाई यांना ७९,७६७ मत मिळाली तर राहुल शेवाळे यांना ५०,६८४ मत मिळाली. माहीम शिंदे सेनेचे सदा सरवणकर यांच्या मतदारसंघात अनिल देसाई यांना ५५,४९८ मत मिळाली तर राहुल शेवाळे यांना ६९,४८८ मत मिळाली. सायन कोळीवाडा, भाजपचे कॅप्टन तमिळ सेल्वन मतदारसंघात अनिल देसाई यांना ७०,९३१ मते मिळाली तर राहुल शेवाळे यांना ६१,६१९ मते मिळाली. वर्षा गायकवाड यांच्या धारावी मतदारसंघात अनिल देसाई यांना ७६,६७७ मतं मिळाली तर राहुल शेवाळे यांना ३९,५२० मत मिळाली.

उत्तर मुंबई: उत्तर मुंबई मतदारसंघात बोरवली भाजपाचे आमदार सुनील राणे यांच्या मतदारसंघात पियुष गोयल यांना १,४७,१०० मतं मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांना ४६,३२५ मतं मिळाली. मालाड पश्चिम काँग्रेसचे अस्लम शेख आमदार असलेल्या मतदारसंघात पियुष गोयल यांना ८७,४४० मतं मिळाली तर भूषण पाटील यांना ८८,२७५ मतं मिळाली.

भाजपा आमदारांचे काय? वरील आकड्यांवर नजर टाकली तर वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांनी केवळ त्यांच्या मतदार संघातून अरविंद सावंत यांना ६,७१५ चे मत्ताधिक्य दिलं आहे. तर ते दुसऱ्या मतदार संघाच्या शोधात असल्याचं नितेश राणे म्हणत आहेत. अशा परिस्थितीत मुंबई भाजपा अध्यक्ष, आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम या मतदार संघातून उज्ज्वल निकम यांना केवळ ३,६०६ इतकं मत्ताधिक्य भेटलं. घाटकोपर पश्चिम या राम कदम यांच्या मतदार संघात तर भाजपा उमेदवार मिहीर कोटेचा याचे मताधिक्य तर १५,७४७ मतांनी घटलं आहे. इतकंच नाही, तर सायन कोळीवाडामध्ये भाजपा आमदार तमिळ सेल्वन मतदार संघात राहुल शेवाळे यांचं मताधिक्य ९,३१२ मतांनी घटले आहे. अशा परिस्थितीमध्ये या भाजपा आमदारांना सुद्धा आता नवीन मतदार संघ शोधावा लागेल, की भाजपाचं नेतृत्व त्यांचा पत्ता कट करणार, हा सुद्धा प्रश्न आहे.

हेही वाचा

  1. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत वाद, निलेश राणेंचा उदय सामंतावर गंभीर आरोप - Controversy in Mahayuti
  2. हॉटेल कर थकबाकी प्रकरण : निलेश राणेंकडून 25 लाखांचा धनादेश आणि थकबाकी झाली 'शून्य'

Last Updated : Jun 8, 2024, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.