कोल्हापूर LOK SABHA ELECTION RESULT 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा राज्यातच, नव्हे तर संपूर्ण देशात रंगली होती. कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज विरुद्ध शिवसेनेचे शिंदे गटाचे संजय मंडलिक यांच्यात लढत होती. मात्र, या निवडणुकीत शाहू महाराजांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर, संजय मंडलिक यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत शाहू महाराज मैदानात उतरवल्यानं या निवडणुकीची चर्चा राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात होती.
शाहू महाराजांचा विजय : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून अखेर कोल्हापूरकरांनी गादीला आपला कौल दिलाय. शाहू महाराज छत्रपती यांच्यावर कोल्हापूरच्या जनतेनं विश्वास दाखत त्यांना संसदेत पाठवलंय. त्यांनी शिवसेना (शिंदे) गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा पराभव केलाय. कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा काँग्रेसच्या उमेदवारामुळं चर्चेत होती. काँग्रेसचे नेते, तथा छत्रपती शाहू महाराजांचे १२ वे वंशज शाहू महाराज लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. तसंच त्यांच्याविरोधात संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा महायुतीनं उमेदवारी दिली होती.
2019 च्या तुलनेत एक टक्क्यानं मतदान वाढलं : कोल्हापूर मतदारसंघात (कोल्हापूर लोकसभा) 71.59 टक्के मतदान झालं होतं. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या सरासरीत कोल्हापूर जिल्ह्यानं अव्वल स्थान पटकावलं आहे. कोल्हापुरातील चंदगड, करवीर विधानसभा मतदारसंघात वाढलेल्या मतदानाचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापुरात 71.59 टक्के, तर हातकणंगलेमध्ये 71.11 टक्के मतदान झालं होतं. करवीर तालुक्यात सर्वाधिक 79.61 टक्के मतदान झालं तर कागल तालुक्यात 75.31 टक्के मतदान झालं होतं. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 65.31 मतदान झालं होतं. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 75.32 तर शाहूवाडी, शिरोळ मतदारसंघात 70 टक्क्यांहून अधिक मतदान झालं होतं. दोन्ही मतदारसंघात 2019 च्या तुलनेत एक टक्क्यानं मतदान वाढल होतं.
हे वाचलंत का :