नाशिक Lok Sabha Election 2024 : नासिक लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज यांनी भुजबळ फार्म इथं मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. या पूर्वी महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार, सुभाष भामरे, हेमंत गोडसे यांनी भुजबळ यांची भेट घेतली होती. मात्र अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आला आहे.
शांतीगिरी महाराजांची भुजबळांशी बंद दाराआड चर्चा : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी रिंगणातून छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटानं हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटानं राजाभाऊ वाजे यांनी उमेदवारी दिली आहे. तसेच शांतीगिरी महाराज हे अपक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. या लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शांतीगिरी महाराज हे महायुतीकडून उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही होते. मात्र महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर महायुतीनं शांतीगिरी महाराजांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र शांतीगिरी महाराज हे निवडणूक लढवण्यावर ठाम राहिलेत. अशात स्वामी शांतीगिरी महाराज यांनी भुजबळ फार्मवर मंत्री छगन भुजबळांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. अपक्ष उमेदवार असलेले शांतिगिरी महाराजांनी महायुतीच्या नेत्याची भेट घेतल्यानं हा विषय चर्चेचा ठरला आहे.
भुजबळ समर्थक कोणाला करणार मदत : छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे ते चर्चेत आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांचं समर्थक नाशिक मतदार संघातून महायुतीची उमेदवारी न मिळाल्यानं नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थक कार्यकर्ते हे त्या निवडणुकीत कोणाला मदत करतात, हा उत्सुकतेचा विषय आहे. अशात महायुतीचे उमेदवार खासदार गोडसे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. मंत्री भुजबळ यांनी या बैठकीत हेमंत गोडसे यांना महायुतीचे नेते म्हणून सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं होते. मात्र असं असलं तरी या निवडणुकीत छगन भुजबळ समर्थक कुणाला मदत करतात, याकडं सर्वांचेच लक्ष लागलं.
शांतीगिरी महाराजांच्या भेटीनं चर्चेला उधाण : नाशिकचे भाजपा पदाधिकारी दिनकर पाटील हे देखील नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी जोरदार तयारीला सुरुवातही केली होती. मात्र हेमंत गोडसेंना तिकीट मिळाल्यानं दिनकर पाटील हे सध्या नाराज आहेत. अशातच आज प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरी महाराज यांनी दिनकर पाटील यांची घरी भेट घेतली. विशेष म्हणजे दोघांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा देखील झाली. या भेटीनंतर महायुती गटात चर्चेला उधाण आलं आहे.
हेही वाचा :
- मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस; काय आहे प्रकरण? - Sudhakar Badgujar
- कुंभनगरी नाशिकमध्ये चार अध्यात्मिक गुरु लोकसभेच्या आखाड्यात; तिघांना लढायचं भाजपाच्या तिकीटावर - lok sabha election
- हुशशश! अखेर नाशिकमधील महायुतीचा तिढा सुटला; आज जाहीर होणार उमेदवार, गिरीश महाजनांची माहिती - Lok Sabha Election