ETV Bharat / state

अनवाणी पायांनी मतदान केंद्रात जात पद्मश्री राहीबाई पोपेरेंनी बजावला मतदानाचा हक्क - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : 'बीजमाता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी अनवाणी पायांनी मतदान केंद्रात जात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तसंच यावेळी त्यांनी सर्वांनी मतदान करावं, असं आवाहनही केलं.

Lok Sabha Election 2024 Phase 4 Voting Padmashri Rahibai Popere exercised her right to vote
पद्मश्री राहीबाई पोपेरेंनी बजावला मतदानाचा हक्क (reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 10:13 AM IST

Updated : May 13, 2024, 10:40 AM IST

अहमदनगर Lok Sabha Election 2024 : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज (13 मे) पार पडत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात अनेक नेत्यांनी देखील मोठा सहभाग दर्शवला असून सकाळपासूनच उमेदवार थेट मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन आपला हक्क बजावताना दिसत आहे. तर पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी देखील अनवाणी अनवाणी पायांनी मतदान केंद्रात जात आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय.

सर्वांनी मतदान करावं : गावरान आणि देशी बियाणे संवर्धन करणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क अकोले तालुक्यातील कोंभाळणे या त्यांच्या जन्मगावी बजावला. रांगेत उभं राहून लोकशाहीचा आदर करत त्यांनी सन्मानपूर्वक आपला मतदानाचा अधिकार बजावला. विशेष म्हणजे पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या पायातील चपलाचे जोडे बाजूला ठेवत अनवाणी पायानं जात पद्मश्री पुरस्कार स्वीकारला होता. त्याचप्रमाणे आज आपला मतदानाचा हक्क बजावताना त्यांनी आपले पायातील जोडे मतदान केंद्राच्या बाहेर काढत लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवात आपल्या परंपरा जतन करत सहभाग नोंदवला. तसंच यावेळी ईटीव्ही भारतशी संवाद साधतांना त्यांनी, सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन केलं.

नगर जिल्ह्यातील दिग्ग्जांनी केलं मतदान : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आमदार लहू कानाडे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी मंत्री मधुकर पिचड या जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा -

  1. रावसाहेब दानवे, सुजय विखे पाटील यांच्यासह ‘या’ नेत्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क - Lok Sabha Elections 4th Phase
  2. चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45% मतदान - Lok Sabha election 2024 Phase 4
  3. देशातील 96 जागांवर मतदान; 5 केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज रिंगणात, ओवैसी, किशन रेड्डींसह अल्लू अर्जुननं केलं मतदान - Lok Sabha Election 2024

Last Updated : May 13, 2024, 10:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.