गडचिरोली - मतदान झालेले ईव्हीएम आणि मतदान अधिकारी गडचिरोलीत हेलिकॉप्टरने तळावर परत येऊ लागले आहेत. दुर्गम भाग आणि नक्षलवादी परिसर असल्याने खबरदारी म्हणून हेलिकॉप्टरने मतदान यंत्रे मुख्यालयाच्या ठिकाणी आणण्यात येतात.
मतदान झालेले ईव्हीएम आणि अधिकारी गडचिरोलीत हेलिकॉप्टरने मुख्यालयात परत - Lok Sabha Election 2024 Live Update - LOK SABHA ELECTION 2024 LIVE UPDATE
Published : Apr 19, 2024, 7:07 AM IST
|Updated : Apr 19, 2024, 6:42 PM IST
18:39 April 19
मतदान झालेले ईव्हीएम आणि मतदान अधिकारी गडचिरोलीत हेलिकॉप्टरने मुख्यालयात परत
17:45 April 19
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 5 वाजतापर्यंत 55.11 टक्के मतदान
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 55.11 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात राजूरा 59.14 टक्के, चंद्रपूर 48.20 टक्के, बल्लारपूर 59.06 टक्के, वरोरा 57.56 टक्के, वणी 58.87 टक्के, आर्णि विधानसभा मतदारसंघात 49.70 टक्के मतदान झालं.
17:42 April 19
विदर्भातील ५ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७ टक्के मतदान
सायंकाळी ५ वाजेपर्यंतचे मतदान
भंडारा गोंदिया : ५६.८७ %
चंद्रपूर : ५५.११ %
गडचिरोली-चिमुर : ६४.९५ %
नागपूर : ४७.९१ %
रामटेक : ५२.३८ %
15:56 April 19
चंद्रपूर मतदारसंघात 3 वाजतापर्यंत 43.48 टक्के मतदान
चंद्रपूर - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दुपारी 3 वाजेपर्यंत 43.48 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात राजूरा 43.25 टक्के, चंद्रपूर 37.94 टक्के, बल्लारपूर 47.74 टक्के, वरोरा 44.59 टक्के, वणी 47.50 टक्के, आर्णि विधानसभा मतदारसंघात 41.40 टक्के मतदान झालं.
15:53 April 19
दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.१२ टक्के मतदान
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील राज्यातील पाच मतदार संघात दुपारी ३.०० वाजेपर्यंत ४४.१२ टक्के मतदान झालं आहे.
पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
रामटेक ४०. १० टक्के
नागपूर ३८. ४३ टक्के
भंडारा-गोंदिया ४५ .८८ टक्के
गडचिरोली-चिमूर ५५ .७९ टक्के
चंद्रपूर ४३.४८ टक्के
14:54 April 19
पाच मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात दुपारी १.०० वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान झालंय.

रामटेक २८. ७३ टक्के
नागपूर २८. ७५ टक्के
भंडारा- गोंदिया ३४ .५६ टक्के
गडचिरोली- चिमूर ४१ .०१ टक्के
आणि चंद्रपूर ३०.९६ टक्के
14:34 April 19
मतदान केंद्रावर राडा
चंद्रपूर : मतदान केंद्रावर उमेदवारांच्या लावलेल्या यादीवर काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल असा शिक्का मारण्यात आल्याने हिंदी सिटी हायस्कूल केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा केला. मुनगंटीवार यांच्या निषेधाच्या घोषणा करुन पक्षपात केला जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. नेमका काँग्रेस उमेदवाराच्या नावावरच कॅन्सलचा शिक्का कसा मारला, असा सवाल करत कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. अचानक झालेल्या या गोंधळाने केंद्रावर काहीकाळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
14:11 April 19
अनेक नागरिकांची नावे मतदार यादीतून गायब
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात पूर्वी मतदान केलेल्या अनेक नागरिकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. आज बगडखिडकी परिसरातील प्रियदर्शनी शाळेतील मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी आलेल्या अनेकांची नावे यादीत नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. नागरिकांनी याबाबत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन पडताळणी करूनही ही नावे दिसून आली नसल्याची तक्रार लोकांची आहे. यामुळे प्रियदर्शनी शाळेच्या मतदान केंद्रात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याशी संपर्क केला असता ही यादी जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात आली होती. याबाबत आक्षेप घेण्याचे अपील केले होते. त्यांनी कदाचित आक्षेप घेतला नसावा. किती जणांची नावं यादीत नाहीत याची माहिती घ्यावी लागेल असं त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.
14:07 April 19
नागपूर विभागातील मतदारसंघात एक वाजेपर्यंत सरासरी 32.36% मतदान
नागपूर - विभागातील 5 लोकसभा मतदारसंघात दुपारी 1.00 वाजेपर्यंत सरासरी 32.36% मतदान पार पडले.
14:05 April 19
चंद्रपूर - सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत 30.96 टक्के मतदान
चंद्रपूर : 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत 30.96 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात राजूरा 32.63 टक्के, चंद्रपूर 28.31 टक्के, बल्लारपूर 31.50 टक्के, वरोरा 32.02 टक्के, वणी 30.37 टक्के, आर्णि विधानसभा मतदारसंघात 31.42 टक्के मतदान झालं.
13:13 April 19
केडीके महाविद्यालयातील मतदान कक्षाबाहेर साप आल्याने गोंधळ
नागपूर - केडीके महाविद्यालयातील लोकसभा निवडणुकीच्या मतदान कक्ष क्रमांक 5 च्या बाहेर साप आल्याने गोंधळ उडाला. त्यानंतर वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटीचे सचिव भंडक्कर यांना फोन करुन ही गोष्ट तिथल्या लोकांनी सांगितली. माहिती मिळताच नितीश भंडक्कर, रूपचंद वैद्य, लकी खलोडे मतदान केंद्रावर पोहोचले. मतदान कक्षाच्या बाहेरील झुडपांमध्ये 2.5 फूट लांबीचा विषारी साप आढळून आला. त्यांनी त्याला पकडून जंगलात सोडलं.
12:12 April 19
चंद्रपूर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी केलं मतदान
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. वरोरा येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं. हा लोकशाहीचा उत्सव असून यात सर्वांनी मतदान करून आपलं कर्तव्य बजावावं असं आवाहन देखील त्यांनी केलं.
12:04 April 19
सकाळी ११ वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा. पासून सुरू झालय. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झालं आहे.

रामटेक १६.१४ टक्के
नागपूर १७.५३ टक्के
भंडारा- गोंदिया १९.७२ टक्के
गडचिरोली- चिमूर २४.८८ टक्के
आणि चंद्रपूर १८.९४' टक्के
12:01 April 19
चंद्रपूरमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वसाधारणपणे १५ ते २० टक्के मतदान
चंद्रपूर जिल्ह्यात तालुकानिहाय मतदान टक्केवारी खालील प्रमाणे...
राजुरा - 21.40 %
बल्लारपूर - 20.10 %
चंद्रपूर - 19.03 %
वरोरा - 17.65 %
चिमूर - 21 %
ब्रह्मपुरी - 21 98%
वणी - 19.96%
आर्णी -15.50 %
11:53 April 19
नाना पटोले यांनी केले मतदान
भंडारा : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली तालुक्यातील सुकळी या आपल्या मूळ गावी सहकुटुंब मतदान केलं. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या पूर्व विदर्भातील पाचही जागांवर काँग्रेस उमेदवार बहुमताने निवडून येतील असा विश्वास त्यांनी या वेळेस व्यक्त केला. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील उमेदवार हे नक्कीच निवडून येतील कारण ही निवडणूक जनतेने स्वतः अंगावर घेतलेली आहे. ज्या पद्धतीचं वातावरण आज आहे. त्याचा विचार केला तर नरेंद्र मोदी स्वतः उभे झाले असते तरी ते हरले असते असा असा अनुकूल वातावरण काँग्रेससाठी असल्याने आमचा उमेदवार नक्कीच जिंकेल असा विश्वास आहे.
06:17 April 19
नागपूर Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. नागपूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. मागील निवडणुकीपेक्षा जास्त अंतरानं विजयी होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
कोणत्या जागांवर मतदान : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक एकूण पाच टप्प्यात होणार आहे. महाराष्ट्रातील पाच जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाची सर्व तयारी आज पूर्ण झाली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
पहिल्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला : नागपूर मतदारसंघातून एनडीएचे उमेदवार नितीन गडकरी (भाजपा) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे (काँग्रेस) रिंगणात आहेत. रामटेकमध्ये एनडीएचे उमेदवार राजू पारवे (शिवसेना) तर श्यामकुमार बर्वे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. भंडारा-गोंदिया मतदारसंघात एनडीएचे उमेदवार सुनील मेंढे (भाजपा) तर महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पाटोळे (काँग्रेस) आमनेसामने आहेत. चंद्रपूरमधून एनडीएचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (भाजपा) तर प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून एनडीएकडून अशोक नेते (भाजपा) आणि महाविकास आघाडीकडून नामदेव किरसान (काँग्रेस) आणि वंचितकडून हितेश पांडुरंग मडावी निवडणूक लढवणार आहेत.
5 मतदारसंघात 97 उमेदवार रिंगणात : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली-चिमुर आणि भंडारा-गोंदिया या लोकसभेच्या 5 मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे. यात नागपूरमध्ये 26, चंद्रपूरमध्ये 15, रामटेकमध्ये 28, भंडारा-गोंदियामध्ये 18, तर गडचिरोलीत 10 उमेदवार लोकसभेत आपलं नशीब आजमावतील. पहिल्या टप्प्यात मतदानाला सामोरे जाणारे सर्व मतदारसंघ हे विदर्भातील आहेत.